43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय ‘सातबारा कोरा’ ची घोषणा पूर्ण करा- भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘सातबारा कोरा’ ची घोषणा पूर्ण करा- भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
233

blank

गोंदिया, २५ जून :राज्यातील महाविकास आघाडीतील शिवसेनेने दिलेल्या ‘शिवसेनेचा एकच नारा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा’ ही घोषणा पूर्ण करावी, यासह इतर मागणीचे निवेदन जिल्हा भाजपाद्वारे करण्यात आले आहे. तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना  २४ जून रोजी देण्यात आले आहे.
निवेदनानुसार, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरसकट माफ करावे, यासाठी शासनाने‘शिवसेनेचा एकच नारा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा’ या घोषणेची अंमलबजावणी करावी. खरीप हंगामाचे १२० कोटी रुपये आल्याचे सांगून त्याचे श्रेय सत्ताधारी नेते घेत आहे, परंतु प्रत्यक्षात ५४ कोटी आल्याची माहिती असून उर्वरित ६६ कोटी रुपये बोनसचे त्वरीत देण्यात यावे. रब्बी धान खरेदीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवून रब्बी धानाला बोनस घोषीत करण्यात यावा. कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळी रक्कम जमा करावी, तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपले कर्ज वेळेवर भरले त्यांना प्रोत्साहन रक्कम म्हणून ५० हजार रुपये तत्काळ देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे थकीत व चालू वीजबील माफ करुन नवीन कृषी पंप जोडणी तातडीने देण्यात यावी. लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांचा रोजगार हिरावला असून आर्थिक घडी विस्कटली आहे, त्यामुळे मार्च ते जुलैपर्यंत घरगुती वीज बील माफ करण्यात यावे. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांना त्वरीत मजुरी द्यावी, तसेच कोविद १९च्या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांना कमी दरात खते व कीटकनाशके उपलब्ध करण्यात यावे, आदी मागण्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना खा. सुनिल मेंढे, माजी आ. गोपालदास अग्रवाल, माजी आ. रमेश कुथे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जिप अध्यक्ष नेतराम कटरे, जिल्हा महामंत्री संघटन विरेंद्र अंजनकर, ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदकुमार बिसेन, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, संजय कुळकर्णी, दीपक कदम, जयंत शुक्ला, संजय टेंभरे, नरेंद्र तुरकर,  गोल्डी गावंडे, मनोज मेंढे, अशोक चौधरी, देवचंद नागपुरे, अशोक जयसिंघानी, अमृत इंगळे, गुड्डू लिल्हारे, गजेंद्र फुंडे, अजय गौर, राजेश चौरसिया, तिजेश गौतम, आशिष हेमणे, रंजीत लांजेवार, प्रेमकृष्ण बिलवंशी, सोमेश्वर तुरकर आदी उपस्थित होते.

blank