31.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home राजकीय इंधनदरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

इंधनदरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

0
160

गोंदिया,दि.25ः गेल्या १७ दिवसांपासून देशात सतत पेट्रोल व डिझेल ची दरवाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे. शिवाय महागाईला वाव मिळत आहे. यामुळे इंधनवाढीच्या विरोधात गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. दरम्यान दरवाढ मागे घेण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत केंद्र सरकारला देण्यात आले.
अलीकडे कोरोना विषाणूची आपत्ती तर दुसरीकडे केंद्र सरकार गेल्या १५ दिवसांपासून सतत पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत वाढ करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे मुल्य कमी झाले असतानाही दरवाढ करून सर्वसामान्य नागरिकांना अडचणीत आणण्याची केंद्र शासनाची भूमिका आहे. यामुळे वाहतूक व्यवसायाला महागाईचा फटका बसत आहे. त्यातच जीवनोपयोगी वस्तुंच्या किंमतीमध्येही वाढ होत आहे. हे संकट केंद्र सरकार जाणून सर्वसामान्य नागरिकांवर लादत आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. केंद्र शासनाने दरवाढीची श्रृंखला थांबावी तसेच पेट्रोल व डिझेलच्या किंमतीतील वाढ मागे घेण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत केंद्र सरकारला देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव विनोद हरिणखेडे, अशोक शहारे, श्रीमती सुशिला भालेराव, नानु मुदलीयार, हरबक्स गुरनानी आदि उपस्थित होते.