38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना,चालु हंगामात मिळणार खरीप पीककर्ज

कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना,चालु हंगामात मिळणार खरीप पीककर्ज

0
184

 भंडारा, दि. 25 : – राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहिर केली आहे. त्यानुसार योजनेंतर्गत भंडारा जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांकडील 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम 2 लाख रुपयांपर्यंतआहे अशा शेतकऱ्यांचे अल्प, अत्यल्प भुधारक या प्रमाणे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या अर्ज खात्यात 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत देण्यात येणार आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना चालु खरीप हंगामात पीक कर्ज मिळणार असल्याचे 22 मे 2020 च्या शासन निर्णयान्वये शासनाने जाहिर केलेले आहे.

कर्जमाफीस पात्र असूनही खात्यात पैसे व आलेल्या जिल्हयातील शेतकऱ्यांना आता चालु खरीप पीक कर्जाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतिक्षेत व केवळ आधारकार्डचे प्रमाणीकरण राहिलेल्या जिल्हयातील शेतकऱ्यांना शासन निर्णयातील घोषणेमुळे मोठा  दिलासा मिळणार आहे.

त्यानुषंगाने जिल्हयामध्ये महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रियकृत बँक, ग्रामीण बँक व खाजगी बँकांनी निकषाप्रमाणे 34 हजार 600 पात्र शेतकऱ्यांची खाती शासन पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यापैकी विशिष्ट क्रमांकासह आधार प्रमाणिकरणासाठी 31 हजार 407 लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली व आतापर्यंत 24 हजार 529 लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले आहे. कोविड-19 च्या प्रार्दुभावामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून मध्यल्या दोन महिण्याच्या कालावधीत आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली होती. 17 जून 2020 पासून पुन्हा आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया कायान्वित करण्यात आलेली असून ज्या लाभार्थीचे नाव विशिष्ट क्रमांकासह प्रसिध्द केलेल्या यादीत समाविष्ट आहे  त्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे जिल्हा उपनिबंधक यांनी आवाहन केले आहे.

कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेतील ज्या लाभार्थी शेतकरी सभासदांना लाभ मिळालेले शेतकरी व कोविड-19 मुळे लाभ जमा न झालेले शेतकरी अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज वाटप करावयाचे आहे. त्यानुसार योजनेच्या लाभार्थी यादीत ज्या शेतकऱ्यांचे नाव आहे अशा शेतकऱ्यांनी संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखा, राष्ट्रियकृत बँकेच्या शाखेशी संपर्क साधून कर्ज प्रकरण सादर करावे.

त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे केवळ नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये असल्यामुळे पीककर्ज मिळण्यासाठी बँकांना विनवणी करावी लागत होती. परंतु आता कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळणार असून अशा शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सचिवांशी संपर्क साधून कर्ज प्रकरणे नजिकच्या बँक शाखेत सादर करुन कर्ज वाटपाचा लाभ घ्यावा.

तरी जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांची नावे शासनाने प्रसिध्द केलेल्या यादीत आहे व ज्यांना कर्जमाफीचा लाभ अद्याप मिळालेला नाही परंतु प्रसिध्द केलेल्या यादीत नाव आहे व ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला असून थकीतांच्या यादीतून ज्यांची मुक्तता झाली आहे,  त्यांनी पीककर्ज प्राप्त करण्यासाठी तालुका सहाय्यक निबंधक व नजिकच्या बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे.              00000

blank