भंडारा,दि.26 :- जिल्हयातील शिधापत्रिका धारकांना जुलै 2020 करीता सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्तभाव दुकानामधून शिधावस्तूंचे वाटप निश्चित करण्यात येत आहे.
अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्याकरिता :- प्रती शिधापत्रिका गहु 10 किलो 2 रुपये दराने, तांदुळ 25 किलो 3 रुपये दराने आणि तुर डाळ 55 रुपये, चना डाळ 45 रुपये दराने व साखर 20 रुपये प्रती शिधापत्रिकेप्रमाणे देण्यात येईल.
प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी :- प्रती व्यक्ती गहु 2 किलो 2 रुपये दराने, तांदुळ प्रती 3 किलो 3 रुपये दराने व 1 किलो तुर डाळ 55 रुपये, 1 किलो चना डाळ 45 रुपये दराने शिधापत्रिकेप्रमाणे देण्यात येईल. (साठा उपलब्धेतनुसार)
तसेच केरोसीन मिळण्यास पात्र शिधापत्रिकाधारकांना 1 व्यक्ती 2 लिटर, 2 व्यक्ती 3 लिटर व 3 व्यक्ती व वरील केरोसीन मिळण्यास पात्र शिधापत्रिकाधारकांना 4 लिटर या प्रमाणे केरोसीन देय असून शासनाकडून उपलब्धतेनुसार व प्राप्त नियतनाचे प्रमाणानुसार केरोसीन उपलब्ध करण्यात येईल.गॅस धारकांना केरोसीन देय्य नाही. जे शिधापत्रिकाधारक हमीपत्र सादर करतील अशाच शिधापत्रिकाधारकांना केरोसीन देय राहील, असे जिल्हा पुरवठा अधिकारी,भंडारा यांनी कळविले आहे.




