30.7 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ शिधावस्तूंच्या  वाटपाचे प्रमाण निश्चित

शिधावस्तूंच्या  वाटपाचे प्रमाण निश्चित

0
376

भंडारा,दि.26 :-   जिल्हयातील शिधापत्रिका धारकांना  जुलै 2020 करीता सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत  रास्तभाव दुकानामधून शिधावस्तूंचे वाटप निश्चित करण्यात येत आहे.

 अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्याकरिता :- प्रती शिधापत्रिका गहु 10  किलो 2 रुपये दराने, तांदुळ 25 किलो 3 रुपये दराने आणि तुर डाळ 55 रुपये, चना डाळ 45 रुपये दराने व साखर 20 रुपये प्रती शिधापत्रिकेप्रमाणे देण्यात येईल.

 प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी :- प्रती व्यक्ती  गहु 2 किलो  2 रुपये दराने, तांदुळ प्रती 3 किलो 3 रुपये दराने व 1 किलो तुर डाळ 55 रुपये, 1 किलो चना डाळ 45 रुपये दराने  शिधापत्रिकेप्रमाणे देण्यात येईल. (साठा उपलब्धेतनुसार)

तसेच केरोसीन मिळण्यास पात्र शिधापत्रिकाधारकांना 1 व्यक्ती 2 लिटर, 2 व्यक्ती 3 लिटर व 3 व्यक्ती  व वरील केरोसीन मिळण्यास पात्र शिधापत्रिकाधारकांना 4 लिटर या प्रमाणे केरोसीन देय असून शासनाकडून उपलब्धतेनुसार व प्राप्त नियतनाचे प्रमाणानुसार केरोसीन उपलब्ध करण्यात येईल.गॅस धारकांना केरोसीन देय्य नाही. जे शिधापत्रिकाधारक हमीपत्र सादर करतील अशाच शिधापत्रिकाधारकांना केरोसीन देय राहील,  असे  जिल्हा पुरवठा अधिकारी,भंडारा  यांनी कळविले  आहे.