
गोंदिया,दि.27- जिल्ह्यात आज कोरोना विषाणू संसर्ग बाधित एक रुग्ण आढळून आला आहे.हा रुग्ण मुंबई येथे नोकरीला आहे.आतापर्यंत 106 बाधित रुग्ण आढळून आले.गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेकडे 394 अहवाल प्रलंबित आहे.त्यातच गोंदिया तालुक्यातील मुंडीपार एमआयडीसी येथील नागपूर येथे बाधित आढळलेल्या रुग्णाचा नागपूर येथे काल मृत्यू झाला.त्या रुग्णावंर गोंदियातील 3 डाॅक्टरांनी उपचार केले असल्यामुळे त्या डाॅक्टरांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात 102 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.जिल्ह्यात आता 3 क्रियाशील रुग्ण आहेत. जिल्ह्यात आढळलेले 106 कोरोना बाधित रुग्ण हे अर्जुनी/मोरगाव तालुका – 31,सडक/अर्जुनी तालुका – 10, गोरेगाव तालुका – 4, आमगाव तालुका -1, सालेकसा तालुका – 2, गोंदिया तालुका – 23 आणि तिरोडा तालुक्यातील 34 रुग्ण आहे.आज आढळलेला एक रुग्ण हा मुंबई येथील आहे.
गोंदियाच्या प्रयोगशाळेत कोरोना संशयित 2560 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.त्यामध्ये 106 रुग्ण हे कोरोना बाधित आढळुन आले.काल नागपूर येथे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा समावेश जिल्ह्यातील 106 बधितांमध्ये करण्यात आला आहे.जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 560 आणि घरी 1901 अशा एकूण 2461 व्यक्ती विलगीकरणात आहे.
जिल्ह्यातील चोवीस कंटेंटमेंट झोनपैकी दहा झोन बंद करण्यात आले आहे.उर्वरित 10 पैकी सालेकसा तालुक्यातील बामणी हे झोन वगळता उर्वरित 9 कंटेंटमेंट झोनमधील नागरिकांना उपलब्ध सेवामध्ये शिथीलता देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.जिल्ह्यात आता क्रियाशील कंटेंनमेंट झोन दहा असून यामध्ये गोंदिया तालुका – नवरगाव/ कला,कटंगी, परतवाडा,चुटिया, रजेगाव, गजानन कॉलनी व काटी. सालेकसा तालूका -धनसुवा व बामणी.तिरोडा तालुका-तिरोडा आदी.दहा झोनचा समावेश आहे.





