आमगाव,दि.27: पतीपासून विभक्त असलेली महिला आपल्या आईकडे राहता-राहता प्रियकरासाठी आमगावला राहायला आली. परंतु सहा महिन्यापासून आमगावात आलेल्या प्रयशीने चक्क प्रियकराच्या घरी गळफास घेऊन आत्हमत्या केली. ही घटना २७ जूनच्या सकाळी ७ वाजता उघडकीस आली. सिमा गेंदलाल खंडाते (३५) रा. आमगाव असे आत्महत्या करणाºया महिलेचे नाव आहे.
सीमा देवरी तालुक्याच्या नरेटीटोला येथील आहे. तिच्या लग्नानंतर एक मुलगी झाली व पतीपत्नीचे पटत नसल्यामुळे सीमा ही मुलीला घेऊन माहेरी देवरी येथे मागील १४ वर्षापासून आईकडे राहात होती. देवरीच्या स्टेट बँकेच्या शाखेत खासगी कर्मचारी म्हणून ती काम करीत होती. पतीपासून विभक्त राहणाºया सीमाचे आमगावातील राहूल मोहबिया या तरूणाशी सूत जुळले. त्याच्या प्रेमापोटी ती आमगावला राहायला आली. डिसेंबर २०१९ मध्ये आमगावात आपल्या मुलीला घेऊन राहायला आलेली सीमा देवरी येथे खासगी नोकरी करीत असतांना ती ये-जा करायची. मायलेकी भाड्याच्या खोलीत राहात होत्या. सीमाने २७ जूनच्या पहाटे ३ वाजता प्रियकर असलेल्या राहूल मोहबिया याच्या घरी जाऊन घराबाहेरील खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली. या संदर्भात सीमाच्या आईने आमगाव पोलिसात तक्रार केली आहे.
प्रियकराच्या घरी गळफास घेऊन प्रेयशीची आत्महत्या
आमगाव येथील घटना: १४ वर्षापासून परित्यक्ता म्हणून जगत होती





