
गोंदिया,दि.२८::कोरोना विषाणू संसर्ग झालेले नवे सात बाधित रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहे.यातील एक रुग्ण हा मुंबई येथे नौकरीला आहे तर उर्वरित सहा रुग्ण हे नागपूर येथे कोरोना बाधित आढळून मृत पावलेल्या रुग्णासोबत त्याच कंपनीत मुंडीपार औद्योगिक वसाहतीत नोकरीला आहे.सर्व रुग्ण हे 20 ते 60 वर्षे वयोगटातील आहे.जिल्ह्यात हे आज सात रुग्ण नव्याने आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बधितांची संख्या आता 113 वर पोहचली आहे.
गोंदिया तालुक्यातील M.I.D.C. मुंडीपार येथील नस कंपनी मधील मनेजरचा किडनी आजाराने मृत्यू झाल्यानंतर कोरोना टेस्टमध्य़े पॉझिटिव्ह आलेला होता.त्यानंतर संपर्कातील लोकांचे नमुने घेण्यात आले होते.त्यात फत्तेपूर ,मुंडीपार,सेजगाव व डोंगरगाव येथील प्रत्येकी 1 जण तर गोंदियातील एकाचा समावेश आहे. तर सालेकसा तालुक्यातील पाऊळदौना येथील एक व्य़क्ती बाधित आल्याने गाव कंटेनमेंट झोन तर पांढरी गावाचा बपर झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.सदर व्यक्ती 23 जून रोजी मुंबई हावडा मेल ने सालेकसा येथे आलेला आहे.सदर रुग्ण व्यक्ती मुंबई महानगरपालिकेत शिक्षक आहेत,त्यांच्यासोबत आलेल्या दोन मुले,पत्नी व बहिण यांनाही क्वारंटाईन करण्यात आलेले आहे.
गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेकडे 137 अहवाल प्रलंबित आहे.आतापर्यंत 102 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.जिल्ह्यात आता 10 क्रियाशील रुग्ण आहेजिल्ह्यात आढळलेले 113 कोरोना बाधित रुग्ण हे अर्जुनी/मोरगाव तालुका – 31,सडक/अर्जुनी तालुका – 10, गोरेगाव तालुका – 4, आमगाव तालुका -1, सालेकसा तालुका – 2, गोंदिया तालुका – 29, तिरोडा तालुक्यातील 34 रुग्ण आहे आणि मुंबई येथील दोन रुग्ण आहे.आज आढळलेल्या रुग्णामध्ये गोंदिया तालुक्यातील 6 रुग्ण तर एक रुग्ण हा मुंबई येथून आलेला आहे.
गोंदियाच्या प्रयोगशाळेत कोरोना संशयित 2640 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.त्यामध्ये 113 रुग्ण हे कोरोना बाधित आढळुन आले.तर 137 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे.जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 524 आणि घरी 1781अशा एकूण 2305 व्यक्ती विलगीकरणात आहे.
जिल्ह्यातील 16 कंटेंटमेंट झोनपैकी सालेकसा तालुक्यातील बामणी व,पाथरी.गोंदिया तालुक्यातील मुंडीपार, फतेहपूर, डोंगरगाव, शेजगाव, कुंभारेनगर (गोंदिया) हे झोन वगळता उर्वरित 9 कंटेंटमेंट झोनमधील नागरिकांना उपलब्ध सेवामध्ये शिथीलता देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आता क्रियाशील कंटेंनमेंट झोन सोळा असून यामध्ये गोंदिया तालुका – नवरगाव/ कला,कटंगी, परसवाडा,चुटिया, रजेगाव, गजानन कॉलनी, काटी,मुंडीपार, फतेहपूर, डोंगरगाव, शेजगाव, कुंभारेनगर (गोंदिया) सालेकसा तालूका -धनसुवा,बामणी व पाथरी आणि तिरोडा तालुका -तिरोडा आदी.सोळा झोनचा समावेश आहे.




