27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home गुन्हेवार्ता 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

0
1412

वर्धा,दि.28- नोकरीचे आमिष दाखवून सामूहिक बलात्कार केल्याची घटना वर्ध्यातील देवळी परिसरात घडली आहे. सावंगी पोलिसांनी या प्रकरणात सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

वर्धा यवतमाळ हायवे लगतच्या परिसरात ही घटना घडली आहे. 19 वर्षीय तरुणीला नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून देवळीकडे जाणाऱ्या फार्म हाऊसवर नेण्यात आले. येथे सहा जणांनी तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणात सावंगी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले आहे.शनिवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. सावंगी पोलिसांनी काही तासातच सहाही आरोपीला अटक, केली आहे.घटनेचा अधिक तपास सावंगी पोलीस करीत आहे