गोंदिया,दि.२८ः जिल्हा परिषदेच्या या पदाधिकाèयांचा कार्यकाळ येत्या १४ जुर्लेला संपत आहे,त्यापुर्वी शेवटची सर्वसाधारण सभा उद्या सोमवारला(दि.२९)आयोजित करण्यात आली आहे.या सर्वसाधारण सभेत बांधकाम विभागाच्या अनेक कामांसह कोवीड काळात गाळे वाटप करण्यात आल्याचे प्रकरण चर्चेला येण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्हा परिषदेच्यावतीने ५ तालुक्यातील ५0 दुकान गाळ्यांसांठी 117 अर्जदारांनी अर्ज केले होते.त्या अर्जदारांच्या अनामत रक्कम धनादेशाकडे बघितल्यास नेत्यांनी मोठ्या शिताफिने गाळे वितरण करण्यासाठी अर्ज मागविले असले तरी दुकानगाळे वितरणात मोठ्याप्रमाणात घोळ झालेला आहे.विशेष म्हणजे दोन तीन वर्षापुर्वीच्या दुकानगाळे लिलाव प्रकरण अजून न्यायालयात प्रलबिंत असताना विद्यमान अध्यक्षांनी त्याकडे कानाडोळा करीत दुकान गाळे वाटपासाठी केलेली घाईगर्दी आणि त्यासाठी धनादेश मागवितांना लागोपाठ क्रमांकाचे आलेले धनादेश क्रमांक बघून आपल्या जवळच्यांना किंवा ज्यांच्याकडून काहीतरी विशेष लाभ मिळाले असेल अशांना दुकान उपलब्ध करुन देण्यासाठी करण्यात आलेली ही घाईगर्दी ठरली. जिल्हापरिषदेच्या उत्पन्नाचे नुकसान करीत जिल्हापरिषदपासून पंचायत समितीपर्यंतच्या सर्वांनीच आपल्या उत्पन्नाचे विचार करीत जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचे नुकसान तर केले नाही ना अशा अनेक प्रश्नांना या सर्व बाबींकडे नजर फिरवल्यास आणि समोर आलेल्या माहितीकडे बघितल्यावर दिसून येत आहे.विशेष म्हणजे या दुकानगाळे वाटप समितीमध्ये अनेकांना बाजुला ठेवण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
ज्या वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात देण्यात आली,त्यापैकी दोन वृत्तपत्र गोंदिया जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षात कधीच वाचले गेलेले नाहीत,किंवा जिल्हा परिषदेच्या कुठल्या कार्यालयातही येत नाहीत.तरीही सामान्य प्रशासन विभागाने गोंदिया जिल्हा बाहेरील त्या दोन वृत्तपत्रांना जाहिरात कशी दिली हा एक मुद्दा महत्वाचा ठरला आहे.जेव्हा की,गोंदिया जिल्ह्यातून प्रकाशित क वर्गाच्या एकाही वृत्तपत्राला गोंदिया वगळता इतर जिल्ह्यातील जिल्हा परिषदच काय जिल्हा माहिती अधिकारी सुध्दा जाहिरात देत नाही.मग गोंदिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागालाच एवढा पुळका का हा विषय आत्ता कळू लागलेला आहे.काही निविदा या जिल्हापरिषदेसह गावपातळीवर प्रशासकीय यंत्रणेसह लोकामध्ये चर्चेला असलेल्या वृत्तपत्रामध्ये द्यायचा असतात,मात्र याठिकाणी जाहिरातीसाठी प्रकाशित होणाèया वृत्तपत्रांना महत्वाच्या जाहिरात दिल्या जात असल्याने त्या जनतेपर्यंत पोचतच नसल्याचे दुकान गाळे वाटप निविदेमध्ये झालेल्या घोळावरुन दिसून येत आहे. एकट्या आमगाव तालुक्यात 20 दुकानांसाठी ३३ अर्ज,अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 12 दुकानांसाठी ५७ अर्ज,देवरी तालुक्यातील 7 दुकानासांठी १६ अर्ज,गोरेगाव तालुक्यात 6 दुकानासांठी ८ अर्ज आणि सालेकसा तालुक्यातील 5 दुकानासांठी ३ अर्जदारांनी अर्ज सादर केले होते.त्यावरुन या दुकानगाळ्यांच्या लिलावाची प्रकिया पार पडली मात्र अनेकांना त्याची माहितीच नाही.त्यातही हे दुकान गाळे खरेदी करण्यात जिल्हा परिषदेत कार्यरत काही शिक्षक गटातील लोकांचा तसेच काही ठेकेदारांचा समावेश असल्याचे यादीवरुन दिसून येते.सोबतच भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यासंह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दुकानासाठी अर्ज केल्याचे दिसून येत आहे.या दुकान गाळ्यासांठी बँकेतून जे अनामत रकमेचे धनादेश तयार करण्यात आले,त्यावरुन तर या वाटपात मोठा घोटाळा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाèयांनी केला हे स्पष्टपणे दिसून येत आहे.गोरेगाव तालुक्यातील अर्जदारांचे नाव आणि त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १० हजार रुपयाचा तयार केलेल्या धनादेशाच्या क्रमांकाचा तपशील बघितल्यास एकाच दिवशी हे सर्व करण्यात आले असून यात स्पष्टपणे सेटींग असल्याचे दिसून येते.गोरेगाव येथील अर्जदार क्रमांक १ चा धनादेश क्रमांक १५२१२६ ते अर्जदार क्रमांक ८ चा धनादेश क्रमांक १५२१३३ हे सलग आहेत,यावरुन या सर्वांना एकाच दिवशी अर्ज करण्यास सांगण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.त्याचप्रमाणे सालेकसा येथील अर्जदारांचेही धनादेश क्रमांक हे लागोपाठ व एकाच बँकेचे आहेत.विशेष म्हणजे दुकानगाळे वाटपात काही राजकीय नेत्यांची नावे बघायला मिळाल्यावर हे दुकानगाळे सर्वसामान्यासांठी नव्हे तर राजकीय नेते व त्यांच्या समर्थकांना वाटपासाठी जिल्हापरिषदेच्या अध्यक्षांनी कशी काय परवानगी दिली असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
दुकान गाळे वाटपात जि.प.अध्यक्ष अधिकाèयांची भूमिका संशयास्पद ?
५0 दुकान गाळे वाटपात गैरव्यवहाराची शंका; दुकान खरेदीच्या अनामत धनादेशावरुन सेटिंग झाल्याचा संशय





