24.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home राजकीय पिपंरी चिचवडचे भाजप आमदार महेश लांडगेना कोरोनाची लागण

पिपंरी चिचवडचे भाजप आमदार महेश लांडगेना कोरोनाची लागण

0
390

पुणे,दि.29ः-औद्योगिक नगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांना  कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांचे रिपोर्ट आज सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका, माजी नगरसेवक असलेल्या त्यांच्या पतीसह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.तसेच भोसरी मतदारसंघातील माजी विरोधी पक्षनेते असलेल्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच दापोडीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.आमदार लांडगे यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या घशातील द्रावाच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या हायरिस्क कॉन्टक्टमधील नागरिकांची आता तपासणी केली जाणार आहे