24.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home Top News शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीचा लोणावळ्याजवळ अपघात

शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीचा लोणावळ्याजवळ अपघात

0
372

पुणे,दि.29. पुण्याहून मुंबईकडे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. लोणावळ्यातील अमृतांजन पूलाजवळ ही घटना घडली. यामध्ये सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. तर शरद पवार हे पूर्णपणे सुरक्षित आहेत.ही घटना सकाळी 10 वाजेदरम्यान घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडी मागे ही गाडी होती. पवारांच्या गाडीला कोणतेही नुकसान झालेलेल नाही. शरद पवार हे सुरक्षित आहेत. घटनेची माहिती मिळताच देवदूत पथक आणि खंडाळा महामार्गाच्या पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. जखमी सुरक्षा रक्षकाला तात्काळ लोणावळ्याच्या एका प्रायव्हेट रुग्णालयात दाखल करण्यात आले.