38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ पशुपालकांनी योजनेचा लाभ घ्यावा

पशुपालकांनी योजनेचा लाभ घ्यावा

0
326

 भंडारा, दि.29 :- शासनाने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2020-21 या वर्षात पशुपालकांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून त्यासाठी अर्जदाराकडून 20 जुलै 2020 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनांचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जिल्हा परिषद भंडारा यांनी केले आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द लाभाथ्यांकरीता विशेष घटक योजना अंतर्गत 2 दुधाळ जनावरांचे 75 टक्के अनुदानावर गट पुरवठा व अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थींच्या दुभत्या जनावरांना 100 टक्के अनुदानावर खाद्य पुरवठा करणे या बाबतच्या योजना आहेत.

अनुसूचित जमातीकरीता आदिवासी उपयोजनेअंतर्गत 2 दुधाळ जनावरांचा 75 अनुदानावर एक दिवसीय सुधारित कुक्कूट पक्ष्यांचे गट पुरवठा करण्यात येते. त्याच प्रमाणे आदिवासी लाभार्थींच्या दुभत्या जनावरांना 100 टक्के अनुदानावर खाद्य पुरवठा करण्यात येते व शेळया व मेंढयांचा गट पुरवठा अंतर्गत 75 टक्के अनुदानावर गट पुरवठा केला जातो.

सर्वसाधारण व अन्य लाभार्थींसाठी एकात्मिक कुक्कूट विकास कार्यक्रमांतर्गत 50 टक्के अनुदानावर एक दिवसीय सुधारित कुक्कूट पक्ष्यांचे गट वाटप करावयोच आहे. तसेच वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रमांतर्गत सर्वसाधारण व अन्य लाभार्थ्यांसाठी 100 टक्के अनुदानावर 1500 रुपयांच्या मर्यादेत वैरण बियाणे व ठोंबे पुरवठा करण्यात येणार आहे.

जिल्हा निधीयोजना सर्वसाधारणयोजनेंतर्गत पशुपालकांसाठी 50 टक्के अनुदानावर शेळी प्रजननासाठी उत्तम प्रतीचा बोकड वाटप ही योजना आहे.

सर्व योजनेसाठी पंचायत समिती अंतर्गत पशुधन विकास अधिकारी यांचे मार्फत इच्छुक लाभाथ्यांकडून 20 जुलै 2020 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्यांनी योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला आहे. अशा पशुपालकांचे अर्ज या वर्षी निवड प्रक्रीयेमध्ये घेतले जाणार नाही. जिल्हयातील सर्व पशुपालकांनी तसेच इच्छुक लाभार्थ्यांनी व जिल्हयातील पशुवैद्यकीय दवाखाण्यामार्फत पंचायत समितीत विहित मुदतीत अर्ज सादर करावा व योजनेचा लाभ घ्यावा.

blank