25 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home गुन्हेवार्ता देवरी तालुक्यात सलून दुकानदाराचा मृत्यू

देवरी तालुक्यात सलून दुकानदाराचा मृत्यू

0
2458

देवरी,दि.30 – कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे गेल्या साडेतीन महिन्यापासून सलून व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक परिस्थितीने मानसिक संतुलन खालावल्यामुळे देवरी तालुक्यात एका सलून व्यवसाय धारकाचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील हा सातवा बळी आहे.
सदर घटना 30 जून मंगळवारला उघडकीस आली असून मृत्यू पावलेल्या सलून व्यवसाय धारकाचे नाव अशोक नामदेव बानक (वय – 35) राहणार डवकी असे आहे.माहितीनुसार, कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे 22 मार्च पासून देशाबरोबर महाराष्ट्रात सुद्धा सलून व्यवसाय बंद होता. त्यामुळे फक्त सलून व्यवसायावर परिवाराचे पालन – पोषण करणाऱ्या अनेक नाभिक बंधूंवर उपासमारीची पाळी येऊन नको त्या समस्यांना आणि प्रसंगांना तोंड द्यावे लागले.त्यातच 28 जून पासून महाराष्ट्र शासनाने लाॅकडाऊनचे अटी व नियम ठेवून सलून दुकान सुरु करण्याची परवानगी दिली.परंतू ,फक्त कटींग करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.दाढी करण्यासाठी नाही.साडेतीन महिन्यापासून सलून दुकान बंदमुळे आधीपासूनच आर्थिक परिस्थितीने मानसिकरित्या खचून गेलेला होता.आणि आता पूर्ण व्यवसाय करता न येत असल्यामुळे अशोक बानक खचले होते.29 जूनला अशोक बानक हे देवरी येथील आपल्या सलूनमध्ये सलून व्यवसाय करण्यासाठी आल्यानंतर रात्री घरी न गेल्यामुळे 30 जून मंगळवारला शोधाशोध केल्यावर देवरी येथील राष्ट्रीय महामार्गावरील एका बँकेच्या शेजारी अशोकचा मृत्यूदेह आढळून आला.अशोकचे शिक्षण बारावी डी. एड झाले होते,त्याच्या मृत्यूमुळे कुटूबिंयावर आर्थिक संकट ओढवले गेले आहे.याप्रकरणात पुढील तपास देवरी पोलीस करीत आहे.