23.6 C
Gondiā
Sunday, July 19, 2026
Home महाराष्ट्र आश्रमशाळेतील 120 विद्यार्थ्‍यांना जेवणातून विषबाधा

आश्रमशाळेतील 120 विद्यार्थ्‍यांना जेवणातून विषबाधा

0
21

नांदेड दि. ११– जिल्‍ह्यातील रिसनगाव (लोहा) येथील दिवंगत मीनाताई ठाकरे आश्रम शाळेमधील 120 विद्यार्थ्‍यांना आज (शनिवारी) जेवणातून विषबाधा झाली. त्‍यांच्‍यावर शासकीय रुग्‍णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे. विषबाधा झालेल्‍यांमध्‍ये शरद चेरले, शैलेश बालाजी जिल्हेवाड, प्रदीप कोपनकर, तुकाराम पंदलवाड, चेतन तुकाराम पंदलवाड, खंडू केरबा चेरले, माधव पांडुरंग डूबुकवाड, रामेश्वर रमेश हाके, सोना सुभाष राठोड, पल्लवी बाजाली उसेलवाड, नागेश टोकलवाड, ज्ञानेश्वर रमेश हाके शंकर व्यंकटेश जेल्हेवाड, वर्षा माधव जिल्हेवाड, वैशाली पंडि‍त गंदलवाड, नवनाथ नरसिंग जेल्हेवाड यांच्यासह इतर विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे.