11/7 बॉम्बस्फोटातील मृतांना मुंबईत श्रद्धांजली!!

0
5

मुंबई, दि. ११– 11 जुलै 2006 रोजी भयानक साखळी बॉम्बस्फोटांच्या मालिकेने मुंबई हादरली होती. 11 मिनिटांत झालेल्या 7 भयानक स्फोटांनी 209 बळी घेतले होते. तसेच 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. आज या घटनेला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, इतक्या वर्षांनतरही मुंबईची ही जखम ओलीच आहे. या बॉम्बस्फोटांत मृत्युमुखी पडलेल्या मुंबईकरांना विविध राजकीय व सामजिक संघटनांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राष्ट्रवादी मुंबई महिला काँग्रेसने श्रद्धांजली वाहिली. अध्यक्ष चित्रा वाघ, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष वंदना माने, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष उमा भास्करन आणि राष्ट्रवादी मुंबई महिला काँग्रेसच्या सदस्य या वेळी उपस्थित होत्या. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनीही मृतांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर बॉम्बस्फोटात जखमी झाल्यानंतर कोमात गेलेल्या पराग सावंत यांच्यावरील उपचारप्रकरणी किरीट सोमय्यांनी हिंदुजा रूग्णालयावर टीकेची झोड उठविली. हिंदुजा रूग्णालयाने परागच्याबाबतीत उपचार नव्हे तर व्यवसाय केला, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. गेल्या नऊ वर्षांपासून हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पराग सावंत यांचे मंगळवारी निधन झाले होते.