33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home Top News नौदलाच्या औषधखरेदीत कोटींचा घोटाळा

नौदलाच्या औषधखरेदीत कोटींचा घोटाळा

0
25

blank

वृत्तसंस्था
नवी दिल्ली,दि.१८: भारतीय नौदलाचे मुंबईतील ‘आयएनएस अश्विनी’ हे इस्पितळ आणि त्याच्याशी संलग्न आस्थापनांमध्ये औषधे व अन्य सामग्रीच्या खरेदीत झालेला मोठा घोटाळा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) उघडकीस आणला आहे.

‘अश्विनी’ इस्पितळ नौदलाचे असले तरी त्याच्या सेवा अन्य सेनादलांनाही उपलब्ध आहेत. संरक्षण दलांच्या इतरही महत्त्वाच्या इस्पितळांमध्येही असाच घोटाळा झाला असल्याची शक्यताही ‘सीबीआय’ तपासून पाहात आहे. ‘सीबीआय’च्यासूत्रांनी सांगितले की, मिळालेल्या तक्रारींवरून नौदल आणि लष्करातील तज्ज्ञांना सोबत घेऊन आमच्या अधिकाऱ्यांच्या दोन तुकड्यांनी शुक्रवारी मुंबईत कुलाबा येथील ‘आयएनएस अश्विनी’ हे इस्पितळ आणि कांदिवली येथील सुरक्षा दलांचा मेडिकल स्टोअर्स डेपो येथे जाऊन तेथील रेकॉर्डची अचानक तपासणी केली. हे वृत्त देईपर्यंतही या तुकड्यांचे तपासणीचे काम सुरू होते.

blank