वैद्यकीय महाविद्यालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

0
11

चंद्रपूर दि.१८: येथील वैद्यकीय महाविद्यालय २०१५ च्या सत्रापासून सुरु होणार असल्याने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी महाविद्यालयाची पाहणी केली. या पाहणीत त्यांना काही त्रृट्या दिसून आल्या. त्यावर त्वरित अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.

यावेळी त्यांच्यासोबत वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. प्रदीप दीक्षित, अधीक्षक अभियंता डी.के. बालपांडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, महानगरपालिकेचे शहर अभियंता महेश बारई, इंडियन मेडीकल अशोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ.अनंत हजारे, उपअभियंता मकवाने, एन. बुरांडे तसेच इतर विभागाचे अधिकारी व कत्रांटदार यावेळी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिका-यांनी मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीची पाहणी करुन तेथे पिण्याच्या पाण्याची सुविधा महानगरपालिकेकडून त्वरित करुन घेण्यात यावी, अशा सूचना संबधिताना दिल्या.

वसतिगृहामध्ये वीज पुरवठा तात्काळ सुरु करण्यात यावा, असे ते म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांचा भोजनकक्ष, अधिकारी-कर्मचा-यांच्या निवासस्थानाची व महाविद्यालयातील सर्व विभागाची पाहणी त्यांनी यावेळी केली.