विदर्भ Archives - Berar Times

अहेरी-गोंदिया मुक्कामी बस सेवा पूर्ववत सुरू करा
विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक व प्रवाशांची गैरसोय

गोंदिया, १९ जुलै=अहेरी ते गोंदिया दरम्यान पूर्वी सुरू असलेली मुक्कामी एसटी बस सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, पालक, कामगार व व्यावसायिकांनी राज्य परिवहन महामंडळाकडे केली आहे. ही बस सेवा बंद झाल्यापासून दोन्ही जिल्ह्यांतील शेकडो प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

वर्षभरापूर्वी अहेरी आगारातून दुपारी २ वाजता सुटणारी ही बस गडचिरोली, आरमोरी, वडसा, लाखांदूर, साकोली, कोहमारा, सडक अर्जुनी व गोरेगाव मार्गे रात्री ८ वाजता गोंदियाला पोहोचत होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता गोंदियाहून अहेरीकडे ही बस रवाना होत असल्याने या मार्गावरील विद्यार्थी, नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणारे नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत होती.

प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही कोणतेही स्पष्ट कारण न देता ही बस सेवा बंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून अतिरिक्त आर्थिक भार आणि वेळेची नासाडी सहन करावी लागत आहे.विशेषतः शिक्षण, नोकरी, वैद्यकीय उपचार व व्यावसायिक कामांसाठी गोंदिया-गडचिरोलीदरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अहेरी आगाराने प्रवाशांची गरज लक्षात घेऊन ही मुक्कामी बस सेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांनी केली आहे.

बस सेवा पुन्हा सुरू झाल्यास गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांतील संपर्क अधिक सुलभ होईल, प्रवाशांची गैरसोय दूर होईल आणि राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

The post अहेरी-गोंदिया मुक्कामी बस सेवा पूर्ववत सुरू करा appeared first on Berar Times.

विकासाच्या वाटचालीत दर्जेदार व अखंड वीजपुरवठा हीच खरी ताकद – आ. राजकुमार बडोले
अर्जुनी-मोर.– तालुक्यातील बाराभाटी/ब्राम्हणटोला येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने उभारण्यात आलेल्या ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते १५ जुलै रोजी उत्साहात संपन्न झाले. या उपकेंद्रामुळे बाराभाटीसह परिसरातील गावांना अधिक सक्षम, दर्जेदार व अखंड वीजपुरवठा उपलब्ध होणार असून शेती, लघुउद्योग, व्यवसाय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार राजकुमार बडोले म्हणाले की, “ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वीज ही मूलभूत गरज आहे. शेतकऱ्यांना सक्षम सिंचन व्यवस्था, युवकांना उद्योग-व्यवसायाच्या संधी आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. बाराभाटी येथील ३३ केव्ही उपकेंद्रामुळे परिसरातील वारंवार होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होईल. भविष्यातही ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न राहील.”

या कार्यक्रमाला जि.प. सदस्य यशवंत गणवीर, जि.प. सदस्या कविताताई कापगते, होमराज कापगते, महावितरणचे उपमुख्य कार्यकारी अभियंता पाटील , पं.स. सदस्य नाजुक कुंभरे, डोंगरवारताई, सरपंच चाकाटेताई, माजी सभापती प्रकाश गहाणे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष भोजू लोगडे, खरेदी-विक्री संघाचे संचालक लेलेश शिवणकर,कृ.उ.बा.स.चे संचालक व्यंकट खोब्रागडे, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी नवीन उपकेंद्रामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रामीण विकासाला गती देणारा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

The post विकासाच्या वाटचालीत दर्जेदार व अखंड वीजपुरवठा हीच खरी ताकद – आ. राजकुमार बडोले appeared first on Berar Times.

जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याच्या खा.राजेंद्र जैन यांच्या सूचना
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची बैठक संपन्न

गोंदिया- प्रशासकीय इमारत, गोंदिया येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्याकरिता आयोजित बैठकीला खासदार राजेंद्र जैन यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून पात्र नागरिकांना प्रत्यक्ष लाभ व पारदर्शक योजना राबविण्याची सूचना केली. यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, तहसीलदार समशेर खान पठान सहित महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात येत असून राज्य शासनाने महसूल विभाग लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी तसेच तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत या महसूल विभागाच्या योजनांचा लाभ घेता यावा या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबवित आहे.

संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे लाभ घेता यावा याकरिता महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिबिराचा आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी तसेच नागरिकांपर्यंत पोहचून प्रचार व प्रसार करावा ज्यामुळे कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही अशा सूचना खासदार राजेंद्र जैन यांनी केल्या. यावेळी सर्वश्री सुरेश हर्षे, केतन तुरकर, नानू मुदलियार, माधुरी नासरे, राज शुक्ला, लोकेश यादव, रवि पटले व अन्य उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान भव्य शिबिराचे आयोजन १ ऑगस्ट रोजी

नागरिकांच्या विविध समस्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी तसेच शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ शेतकरी, महिला, निराधार, ज्येष्ठ नागरिक व सर्व पात्र लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मिळावा, या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानांतर्गत दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.या शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तसेच नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात येणार आहे.

The post जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याच्या खा.राजेंद्र जैन यांच्या सूचना appeared first on Berar Times.

बोटे येथे रस्त्यावरील मातीमुळे दोन आठवड्यांपासून गावकरी त्रस्त; लोकप्रतिनिधींचे ढिम्म दुर्लक्ष
वॉर्ड क्रमांक २ आणि ३ मधील गल्लीत सिमेंट रोडवर खोदकामाचा राडारोडा तसाच

गोरेगाव:तालुक्यातील ग्रामपंचायत बोटे येथे वॉर्ड क्रमांक २ आणि ३ मधील मुख्य गल्लीत सिमेंट रोडवर नाली उपसण्याचे काम करून गेल्या दोन आठवड्यांपासून खोदलेली माती रस्त्यावरच टाकून देण्यात आली आहे. या ढिसाळ कारभारामुळे येण्या-जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, या संदर्भात जाब विचारणाऱ्या गावकऱ्यांना सरपंचांनी थेट मुजोरीची भाषा वापरत “मला वाटेल तेव्हा काम करेन,” असे खडेबोल सुनावल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

रस्त्यावर मातीचे साम्राज्य, अपघाताची भीती

मिळालेल्या माहितीनुसार, बोटे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्र. २ आणि ३ मधील गल्लीत सिमेंट रोडच्या बाजूला नाली खोदण्याचे काम दोन आठवड्यांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, नालीतून काढलेली संपूर्ण माती आणि गाळ कंत्राटदार व ग्राम प्रशासनाने रस्त्यावरच तसाच ठेवून दिला. गेल्या दोन हप्त्यांपासून ही माती रस्त्यावरच पडून असल्याने रस्ता अरुंद झाला असून, पावसाळ्याच्या दिवसांत चिखल होऊन ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शाळकरी मुलांना चालणेही कठीण झाले आहे.

लोकप्रतिनिधी ढिम्म; तक्रार करायला गेल्यावर गावकऱ्यांनाच दम!

या गंभीर समस्येबाबत गावातील जागरूक नागरिकांनी वॉर्ड सदस्य, उपसरपंच आणि थेट सरपंचांकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, आठवडा उलटूनही रस्त्यावरील माती हटवण्यात आली नाही. उलट, या समस्येकडे जाब विचारण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांशी सरपंचांनी अत्यंत उर्मटपणे संवाद साधल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नागरिकांमधून संताप, कारवाईची मागणी:

जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच जर अशी अरेरावीची भाषा वापरत असतील, तर दाद मागायची कोणाकडे? असा संतप्त सवाल बोटे गावातील नागरिक विचारत आहेत. या रस्त्यावरील माती तात्काळ हटवून गावकऱ्यांची समस्या दूर करावी आणि संबंधित मुजोर सरपंचांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

The post बोटे येथे रस्त्यावरील मातीमुळे दोन आठवड्यांपासून गावकरी त्रस्त; लोकप्रतिनिधींचे ढिम्म दुर्लक्ष appeared first on Berar Times.

चिचगड-ककोडी रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळली दुर्मीळ ‘उडणारी खार’; वनविभागाकडून तत्पर उपचार
देवरी ,दि. १८ जुलै: तालुक्यातील चिचगड-ककोडी रस्त्याच्या बाजूला अत्यंत दुर्मीळ मानली जाणारी ‘उडणारी खार’ जखमी अवस्थेत आढळल्याची घटना गुरुवारी (दि. १६) समोर आली आहे. वन्यजीवप्रेमी आणि सजग नागरिकांच्या तत्परतेमुळे या जीवाचे प्राण वाचवण्यात यश आले असून, वनविभागाने तिला तातडीने ताब्यात घेऊन उपचार सुरू केले आहेत.

अशी घडली घटना: गुरुवारी चिचगड-ककोडी मार्गावरून जात असताना प्रा. महेश रहांगडाले यांना रस्त्याच्या कडेला एक खार जखमी अवस्थेत पडलेली दिसली. तिची पाहणी केली असता, ती सर्वसामान्य खार नसून निसर्गाचा अनमोल ठेवा असलेली ‘उडणारी खार’ (Flying Squirrel) असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वेळ न घालवता यासंदर्भातील माहिती वनरक्षक लोकेश टेंभरे व सुरेश रहांगडाले यांना दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून जखमी खारीला आपल्या ताब्यात घेतले आणि प्रथमोपचार सुरू केले. या संदर्भात माहिती देताना चिचगडचे वन परिक्षेत्र अधिकारी पी. बी. वाडे यांनी सांगितले की, “जखमी उडणाऱ्या खारीवर सध्या वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यानंतर आणि ती पुन्हा निसर्गात वावरण्यास सक्षम झाल्यावर तिला सुरक्षितपणे तिच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच जंगलात मुक्त केले जाईल.”वनविभागाच्या या तत्परतेबद्दल आणि प्रा. रहांगडाले यांच्या सजगतेबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.

कायद्याचे कवच: तस्करी आणि शिकार केल्यास कठोर कारवाई! वन्यजीव संरक्षण कायदा २०२२ च्या नवीन दुरुस्तीनुसार, भारतात आढळणाऱ्या सर्व विशाल खारी (Giant Squirrels) आणि उडणाऱ्या खारी (Flying Squirrels) यांचा समावेश आता अत्यंत ‘दुर्मीळ प्रजातीं’मध्ये करण्यात आला आहे. या प्राण्यांना कायद्याने सर्वोच्च संरक्षण प्राप्त आहे. त्यामुळे अशा प्राण्यांची शिकार करणे, त्यांना घरात पाळणे, इजा पोहोचविणे किंवा त्यांची तस्करी करणे हा बिगरजामीनपात्र आणि अत्यंत गंभीर गुन्हा मानला जातो.

The post चिचगड-ककोडी रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळली दुर्मीळ ‘उडणारी खार’; वनविभागाकडून तत्पर उपचार appeared first on Berar Times.

जिगाव धरण प्रकल्पाची वस्त्रोउद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडून पाहणी
बुलढाणा, दि. 17 : राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी आज जिगाव धरण प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. प्रकल्पाची उर्वरित सर्व कामे गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी आमदार चैनसुख संचेती, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, जिगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता परमजित सिंग जुनेजा, प्रवीण चावरे, गणेश हासे तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता परमजित सिंग जुनेजा यांनी प्रकल्पाची सद्यस्थिती, धरणाची जलसाठा क्षमता, सुरू असलेली कामे, धरण क्षेत्रातील भूसंपादन, पुनवर्सन, कालव्यांच्या उभारणीची प्रगती आणि प्रकल्प पूर्णत्वासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती सादर केली. प्रकल्पाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रभावी नियोजन करण्यावर यावेळी चर्चा झाली.

धरण परिसराची पाहणी करताना सहपालकमंत्री सावकारे यांनी प्रकल्पाशी संबंधित तांत्रिक बाबींची माहिती घेतली. धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाची कामे आणि पुनर्वसनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, पुनर्वसनासाठी आवश्यक निधी मिळविण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करावा तसेच सिंचन क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी बोलताना सहपालकमंत्री सावकारे म्हणाले की, जिगाव धरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतीला मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कृषी उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होईल. प्रकल्पाची सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

The post जिगाव धरण प्रकल्पाची वस्त्रोउद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडून पाहणी appeared first on Berar Times.

NAMASTE योजनेद्वारे कचरा वेचकांचे सक्षमीकरण;ग्रामपंचायतींनी नोंदणी मोहिमेला गती द्यावी – पुलकित सिह
चंद्रपूर,दिनांकः17/07/2026 :स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या वतीने ग्रामीण भागातील कचरा वेचकांच्या सन्मान, सुरक्षितता व सामाजिक सक्षमीकरणासाठी NAMASTE (National Action for Mechanised Sanitation Ecosystem) योजनेची प्रभावी जनजागृती सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत कचरा वेचकांची ओळख निश्चित करून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायतींनी नोंदणी मोहिमेला गती द्यावी असे आवाहन जिल्हा परिषद चंद्रपूर मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत नोंदणीकृत कचरा वेचकांना अधिकृत ओळखपत्र, आयुष्मान भारत आरोग्य संरक्षण, वैयक्तिक सुरक्षा साहित्य (PPE Kit), कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कचरा वेचकांचे जीवनमान उंचावण्यास आणि त्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.योजनेसाठी पात्र असलेल्या कचरा वेचकांनी आधार कार्ड, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील तसेच उपलब्ध असल्यास ई-श्रम कार्ड, सदस्यत्व कार्ड किंवा इतर शासकीय ओळखपत्रांसह आपल्या ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधून तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच नागरिकांनी घरगुती कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण केल्यास कचरा वेचकांचे काम अधिक सुरक्षित, सुलभ व परिणामकारक होईल. तसेच पुनर्वापराला चालना मिळून पर्यावरण संरक्षणासही हातभार लागणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायतींनी NAMASTE योजनेची व्यापक प्रसिद्धी करून, गावातील सर्व पात्र कचरा वेचकांची शंभर टक्के नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे आवाहन जिल्हा परिषद चंद्रपूर मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी केले आहे.

The post NAMASTE योजनेद्वारे कचरा वेचकांचे सक्षमीकरण;ग्रामपंचायतींनी नोंदणी मोहिमेला गती द्यावी – पुलकित सिह appeared first on Berar Times.

मध्यान्ह भोजन योजनेतील अन्नाची गुणवत्ता चांगली ठेवा-खासदार डॉ.प्रशांत पडोळे
भंडारा दि.17: शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे भोजन दिले जाते. शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार  सर्व शाळांमध्ये मध्यान्ह आहार देण्याची व्यवस्था केली जाते. मात्र या योजनेमधील अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी शाळेत जेवण झाल्यावर ते शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षणाचे उपस्थित तपासले पाहिजे तसेच अन्नाचे नमुने सुरक्षित ठेवण्याची आणि अन्नाची गुणवत्ता चांगली ठेवण्याची निर्देश खासदार प्रशांत पडोळे यांनी आज दिले.

जिल्हा नियोजन सभागृहात आज जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीला खासदार डॉ. प्रशांत पडोळे, खासदार राजेंद्र जैन, आमदार अविनाश ब्राह्मणकर, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी सावन कुमार मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह उपस्थित होते.

जिल्ह्यातील उज्वला योजनेंतर्गत आतापर्यंत 96 हजार 328 गॅस कलेक्शन देण्यात आले आहेत सध्या नवीन कनेक्शन देण्यासाठी योजना अंतर्गत तीन लाखापर्यंत कनेक्शन देण्याची उद्दिष्टे ठेवण्यात आली आहे, जिल्ह्यात गॅस पुरवठा सुरळीत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. ठाकरे यांनी दिली.त्यावेळी विविध विभागांचा आढावा खासदार महोदयांनी घेतला. त्यामध्ये जिल्ह्यातील कलावंतांना मानधन योजनेबाबत गतीने काम करण्याची निर्देश त्यांनी उपमुख्य कार्यकारी पंचायत श्री. नंदागवळी यांनी दिले.

वरठी बसस्थानकाबाबत आमदार  राजू कारेमोरे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकासाठी जागेचा शोध सुरू असल्याचे राज्य परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.या बैठकीमध्ये पिक विमा योजना, स्वच्छ भारत मिशन, मध्यान पोषण आहार, खरीप पीक वाटप योजना बाबत आढावा घेण्यात आला. स्मार्ट मीटर बाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम असून वीज देयक जास्त येत असल्याबाबत तक्रारी प्राप्त आहे त्याबाबत ग्रामपातळीवर शिबिरे घेऊन नागरिकांना या विषयासंबंधित जाणीव जागृती करण्याचे निर्देश खासदार श्री. पडोळे यांनी महावितरणला दिले दिले.

जिल्ह्यात धानपिका व्यतिरिक्त देखील पिक वैविध्य साठी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातर्फे केलेल्या प्रयत्नांची केलेल्या कामांची माहिती द्यावी खासदार श्री. पडोळे  घेतली. यावेळी सध्या शेतीमध्ये पिकांचे विविधीकरण साठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असून जिल्ह्यात मका लागवड वाढली असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती माने यांनी सांगितले. दिशा समितीच्या बैठकीला अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले पाहिजे व खासदार तथा लोकप्रतिनिधी मागितलेली माहिती त्यांना वेळ सादर केली पाहिजे असे स्पष्ट निर्देश खासदार श्री .पडोळे यांनी दिले.

The post मध्यान्ह भोजन योजनेतील अन्नाची गुणवत्ता चांगली ठेवा-खासदार  डॉ.प्रशांत पडोळे appeared first on Berar Times.

शेतीला आता दिवसा वीज; काटोल तालुक्यात 4 मेगावॅट सौर प्रकल्प कार्यान्वित
नागपूर, दि. 17 जुलै 2026: ग्रामीण महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ ही योजना हाती घेतली आहे. या योजनेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून गुरुवार, 16 जुलै रोजी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील 33/11 के.व्ही. कचारी सावंगा उपकेंद्र परिसरात 4 मेगावॅट क्षमतेचा अत्याधुनिक सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आला.

महाराष्ट्र शासन आणि महावितरण यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ योजने अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील हा पहिलाच सौर ऊर्जा प्रकल्प असून, यामुळे 1,074 शेतक-यांच्या कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या राज्य शासनाच्या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली आहे.

या प्रकल्पाची उभारणी प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. या सौर प्रकल्पामुळे कचारी सावंगा उपकेंद्राशी जोडलेल्या रिधोरा, खापरी कुटूंबा, घरतवाडा, गुजर खेडी, सबकुंड, कोकरडा, कचेरी सावंगा, बोरखेडी आणि पंचधर या नऊ गावातील सुमारे 1074 कृषी पंपांना दिवसा आठ तास अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वीज पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत होते, ज्यामुळे त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असे. आता दिवसा वीज मिळाल्यामुळे सिंचनाचे नियोजन करणे सोपे होणार असून, त्याचा थेट फायदा पिकांच्या उत्पादनावर होणार आहे.

अशा मोठ्या स्वरूपाच्या प्रकल्पाची यशस्वी उभारणी करणे हे एक आव्हानात्मक काम होते. यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन लाभले. यामध्ये नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक, नागपूर ग्रामीणचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, काटोल विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र कटारे आणि चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांनी या संपूर्ण प्रकल्पावर बारीक लक्ष ठेवून तांत्रिक मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हा प्रकल्प अत्यंत कमी वेळेत पूर्ण करणे शक्य झाले.

या सौर प्रकल्पाची प्रत्यक्ष उभारणी आणि त्यापुढील सर्व तांत्रिक बाबी हाताळण्यासाठी काटोल विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक सोनगडे, चाचणी विभागाचे बुंदे, कोंढळी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता निलेश भगत आणि कनिष्ठ अभियंता अशिष कुलसंगे व वैष्णवी पाटील यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून आज हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल झाला आहे. एम.के.एफ. ग्रीन एनर्जीज प्रा. लि. या संस्थेने अत्यंत दर्जेदार पद्धतीने या सौर प्रकल्पाची निर्मिती केली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत नागपूर ग्रामीण मंडळात 4 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. ही केवळ सुरुवात असून, आगामी काळात अशा अनेक सौर प्रकल्पांद्वारे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कृषी वीज पुरवठा अधिक सक्षम आणि शाश्वत केला जाणार आहे. सौर ऊर्जेच्या वापरामुळे केवळ शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, तर पर्यावरणपूरक ऊर्जेलाही चालना मिळणार आहे. कचारी सावंगा येथील या प्रकल्पामुळे काटोल तालुक्यातील कृषी अर्थव्यवस्थेला एक नवी ऊर्जा मिळाली असून, स्थानिक शेतकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे ‘शेतकरी समृद्धी’चे स्वप्न प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने एक आश्वासक पाऊल पडणार असल्याचे मनोगत मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी व्यक्त केले आहे.

The post शेतीला आता दिवसा वीज; काटोल तालुक्यात 4 मेगावॅट सौर प्रकल्प कार्यान्वित appeared first on Berar Times.

गोंदियात मोकाट कुत्र्यांचा हैदोस! शाळेत जाणाऱ्या ७ वर्षीय चिमुरडीवर काळजाचा थरकाप उडवणारा हल्ला!
प्रभाग क्र. ४ मधील घटना; नगर परिषदेच्या ढिम्म कारभाराविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संताप, चिमुरडी थोडक्यात बचावली!

गोंदिया:गोंदिया शहरात बेवारस आणि मोकाट कुत्र्यांची दहशत आता रक्ताच्या थारोळ्यात निष्पापांचे जीव घेण्यापर्यंत पोहोचली आहे. सकाळी अत्यंत उत्साहाने शाळेत जाण्यासाठी घरासमोर उभ्या असलेल्या एका ७ वर्षांच्या निरागस चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांच्या हिंस्त्र कळपाने अचानक प्राणघातक हल्ला चढवला. शहरातील प्रभाग क्र. ४ मध्ये घडलेल्या या थरारक आणि संतापजनक घटनेमुळे संपूर्ण गोंदिया शहरात कमालीची दहशत पसरली असून, नगर प्रशासनाच्या नाकर्तेपणावर नागरिकांकडून तीव्र शब्दांत ताशेरे ओढले जात आहेत.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक ४ मधील रिंग रोडवरील मजारच्या मागे राहणारी ही सात वर्षांची चिमुरडी रोजच्या प्रमाणे गुरुवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी पूर्ण तयारी करून घराबाहेर उभी होती. ती स्कूल बस किंवा वाहनाची वाट पाहत असतानाच, परिसरात फिरणाऱ्या ५-६ भटक्या कुत्र्यांच्या कळपाने तिच्यावर अचानक हल्ला चढवला.कुत्र्यांनी तिला वेढून लचके तोडण्याचा प्रयत्न केला. चिमुरडीने भीतीने आणि वेदनेने टाहो फोडल्यामुळे परिसरातील एका जागरूक महिलेने तातडीने घराबाहेर धाव घेतली. त्या धाडसी महिलेने आरडाओरडा करत दगड मारून कुत्र्यांच्या टोळक्याला पळवून लावले. त्यामुळे या चिमुरडीचा जीव थोडक्यात बचावला, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

घाबरल्यामुळे प्रकृती खालावली; चिमुरडी खाजगी रुग्णालयात दाखल

या भयंकर हल्ल्यात मुलगी शारीरिकदृष्ट्या किरकोळ जखमी झाली असली, तरी कुत्र्यांच्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात गेली आहे. भीतीमुळे तिची प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी तिला तातडीने शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून, तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

नागरिकांचा उद्रेक: आता तरी कारवाई होणार का?

शहरातील प्रत्येक गल्लीबोळात सध्या भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य पसरले आहे. रात्री-अपरात्री तर सोडाच, पण आता लहान मुले भरदिवसा घराबाहेर खेळायला किंवा शाळेत जायलाही घाबरत आहेत. प्रभाग क्र. ४ मधील संतप्त नागरिकांनी प्रशासनाला चेतावणी दिली आहे की, जर तात्काळ या बेवारस कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही, तर नगर परिषदेवर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल.आता तरी गोंदिया नगर प्रशासन या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन शहराला या दहशतीतून मुक्त करणार का? की आणखी एखाद्या निष्पापाच्या बळीची वाट पाहणार? हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

प्रशासनाला थेट सवाल:“गोंदिया नगर परिषदेचे ‘श्वान निर्बीजीकरण’ आणि ‘भटके कुत्रे नियंत्रण’ पथक फक्त कागदावरच मर्यादित आहे का? निष्पाप लहान मुलांचे जीव धोक्यात आल्यावरच कुंभकर्णी झोपेतून जागे होणार का? रस्त्यावरून चालणे आता गुन्हा ठरत चालला आहे, याला जबाबदार कोण?”

The post गोंदियात मोकाट कुत्र्यांचा हैदोस! शाळेत जाणाऱ्या ७ वर्षीय चिमुरडीवर काळजाचा थरकाप उडवणारा हल्ला! appeared first on Berar Times.