26.7 C
Gondiā
Saturday, July 18, 2026
Home विदर्भ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याच्या खा.राजेंद्र जैन यांच्या सूचना

जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याच्या खा.राजेंद्र जैन यांच्या सूचना

0
60

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची बैठक संपन्न

गोंदिया- प्रशासकीय इमारत, गोंदिया येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्याकरिता आयोजित बैठकीला खासदार राजेंद्र जैन यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून पात्र नागरिकांना प्रत्यक्ष लाभ व पारदर्शक योजना राबविण्याची सूचना केली. यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, तहसीलदार समशेर खान पठान सहित महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात येत असून राज्य शासनाने महसूल विभाग लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी तसेच तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत या महसूल विभागाच्या योजनांचा लाभ घेता यावा या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबवित आहे.

संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे लाभ घेता यावा याकरिता महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिबिराचा आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी तसेच नागरिकांपर्यंत पोहचून प्रचार व प्रसार करावा ज्यामुळे कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही अशा सूचना खासदार राजेंद्र जैन यांनी केल्या. यावेळी सर्वश्री सुरेश हर्षे, केतन तुरकर, नानू मुदलियार, माधुरी नासरे, राज शुक्ला, लोकेश यादव, रवि पटले व अन्य उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान भव्य शिबिराचे आयोजन १ ऑगस्ट रोजी

नागरिकांच्या विविध समस्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी तसेच शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ शेतकरी, महिला, निराधार, ज्येष्ठ नागरिक व सर्व पात्र लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मिळावा, या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानांतर्गत दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.या शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तसेच नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात येणार आहे.