आसरअली येथे खवल्या मांजर पकडणार्‍यांना अटक

0
35

सिरोंचा,-तालुक्यातील आसरअली वनपरिक्षेत्रा अंतर्गत चेतलपल्ली या गावातील काही इसमांनी 14 ऑगस्ट रोजी जंगलातून खवल्या मांजर पकडून आणले असल्याची गोपनिय माहिती वनपरिक्षेत्राधिकारी चेतन पाटील यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सापळा रचून मंगळवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास खवल्या मांजरीसह आरोपींना अटक केली. त्यांच्यावर वन गुन्हा 11/2021 दाखल करून करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आसरअली वन परिक्षेत्रा अंतर्गत चेतलपल्ली या गावातील दिवाकर लक्ष्मय्या गावडे हे 14 ऑगस्टला जंगलात गेले असता, खवल्या मांजर आडळून आली. त्यानंतर मांजरीला पकडून जवळपास दोन दिवस आपल्या घरी ठेवले. याची माहिती गावात वार्‍यासारखी पसरली. ही माहिती आसरअली येथील क्षेत्र साहाय्यक श्रीकांत नावघरे यांना मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील यांचा मार्गदर्शनाखाली वनपाल तागडे, वनरक्षक सचिन सडमाके, मोरेश कोल्हे, निमरड, प्रीती पोटावी, सुनीता वेलादी, महेश दुबुला व वनमजुरांच्या साहाय्याने आरोपीच्या घरी आरोपीला खवल्या मांजरासह ताब्यात घेतले.