शिक्षक सी.एच.बिसेन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक साहित्य दर्पण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

0
54

गोंदिया,दि.19ः- अखिल भारतीय मराठी कवी संमेलन बालरक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र द्वारा, आयोजित आभासी अखिल भारतीय मराठी कवी संमेलन राज्यस्तरावर आयोजित करण्यात आले होते. या कवी संमेलनात सहभागी शिक्षक सी.एच. बिसेन यांना साहित्य सेवेत अत्युत्कृष्ट योगदान देऊन, “मृदगंध पावसाचा” ही स्वरचित कविता, उत्कृष्टरित्या सादर केल्याबद्दल त्यांना “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक साहित्य दर्पण राष्ट्रीय पुरस्काराने ऑनलाईन प्रमाणपत्र देऊन  सन्मानित करण्यात आले.

शिक्षक बिसेन साहित्य क्षेत्रात 22 वर्षांपासून कार्यरत असून, साहित्य लेखनाची सुरुवात “आमच्या शाळेचा विकास” या लेखाने, राज्यस्तरीय जीवन शिक्षण मासिक पुणे यातून केली होती.जिल्ह्यातील मूळ साहित्यकार त्यांच्या प्रेरणेतून विद्यार्थी, शिक्षकांमधून, अनेक कवी लेखकांचा उगम झालेला आहे. आजतागायत त्यांचे लेख, कथा, कविता, एकांकिका, सुविचार, चारोळ्या इतर अनेक नामांकित मासिके, विशेषांक, वृत्तपत्रातून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरापर्यंत प्रकाशित झाले असून, 5 पुस्तके सुद्धा प्रकाशित करण्यात आले आहेत.
साहित्य क्षेत्रात समाज विकसनात्सव, जनजागृती ज्योत तेवत ठेवण्याकरिता आधुनिक काळाची गरज ओळखून, समाजपयोगी लेखनकार्य अविरत करीत असून, लेखनकार्य राष्ट्रीय स्तरावरील नामांकित प्लेटफॉर्म वर पोहचले आहे.
साहित्यिक संबंधाने, कौटुंबिक वारसा मुळीच नसतांना, इच्छात्मक प्रयत्नांतून साहित्य कला विकसित करून, उत्कृष्ट शैक्षणिक विद्यादानाचे कार्य करून, साहित्यिक छंद जोपासत आहेत.
त्यांना आजपर्यत विविध पुरस्कार व सन्मानपत्रे राष्ट्रीयस्तरापर्यंत प्राप्त झाले आहेत.सदर पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल, जिल्ह्यातीतील साहित्यप्रेमी, शिक्षकवर्ग, आप्त, मित्रमंडळी अभिनंदनाचा वर्षाव करीत आहे