बिरसोला येथील दिला कोरोना लसीचा तिसरा डोस!

0
181

गोंदिया: कोरोना लसीचे  दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीला चक्क तिसरा डोस? होय कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीला चक्क तिसरा डोस देण्यात आल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यातील बिरसोला येथील प्राथमिक उपकेंद्रात उघडकीस आला असून तिसऱ्या डोसमुळे कुठलाही दुष्परिणाम झाला नसला, तरी यामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. शिवाय लस घेणाऱ्यांचे रेकॉर्ड या केंद्रामध्ये उपलब्ध असते की नाही, यावरसुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भागवत नागफासे वय 45 वर्ष बिरसोला असे तीन डोस घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. संबंधीत व्यक्ती सध्या घाबरलेला आहे.

गोंदिया तालुक्यातील बिरसोला येथील प्राथमिक उपकेंद्रात हा प्रकार उघडकीस आला आहे. भागवत नागफासे यांना आपण लस न घेतल्याचा एक फोन आला. हे कोरोना व्यतिरिक्त दुसरे कोणते तरी लसिकरण असल्याच्या समज त्यांना होत ते लसिकरण केंद्रावर गेले. त्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते, यावर ते पुन्हा लसीकरण केंद्रावर गेला असता, त्याची पडताळणी न करताच त्याला तिसरा डोस देण्यात आला.

ही बाब या व्यक्तीने सांगितल्यानंतर उघडकीस आली. भागवत यांना 15 एप्रिलला पहिला डोस, 27 जुलै ला दूसरा डोझ तर 17 ऑगस्टला तीसरा डोस देण्यात आला आहे. लसीचा तिसरा डोस घेतल्याने कुठलाही दुष्परिणाम झाला नसला, संबधित व्यक्ति दहशतीत असल्याचे सांगण्यात येत आहे. ह्या घटने बाबत संबधित आरोग्य केंद्रात भेट दिली असता हा केवल तांत्रिक घोळ असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकड़ून सांगितले जात असून त्यांनी तीन डोस दिल्याचे नाकारले आहे.

एकंदरीत लसीचा तिसरा डोस घेतल्याने कुठलाही दुष्परिणाम झाला नसल्यामुळे आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा यामुळे उघडकीस आला आहे. याची अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता, या उपकेंद्राकडे लसीकरणाचा अहवाल योग्य ठेवला जात नसल्याची बाब उघडकीस आली असून यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. याची तक्रारसुध्दा आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. याप्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कुठली कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.