प्रतिबंधित गुटख्याचा साठा करणार्‍यावर गुन्हा दाखल

0
45

गोंदिया-शहरात भाड्याच्या घरात साठा करून ठेवलेल्या 4.32 लाखांचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत जप्त केला. यात 17 प्रकारच्या गुटख्यांचा समावेश आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शुभम धनकुमार जैन (28) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी शुभम जैन याने शहरातील बाजार चौक रामनगर परिसरातील भुजाडे यांच्या घरी भाड्याची खोली घेऊन गुटख्याचा साठा करून ठेवल्याची गुप्त माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली. माहितीच्या आधारे 27 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास गोदामावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी धाड घातली.
धाडीत 17 प्रकारचे विविध पानमसाला व सुगंधीत तंबाखू असा एकुण 4 लाख 32 हजार 800 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त गुटख्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून आरोपीवर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.