पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ तात्काळ कमी करा

0
21

गोंदिया : पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यांची दरवाढ केल्यामुळे सामान्य जनतेचे जगाने कठीण झाले आहे. या वाढलेल्या किंमती तात्काळ कमी करण्यात यावे, असे निवेदन विदर्भ राज्य आंदोलन समितीने उपविभागीय अधिकार्‍यामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व पेट्रोलियम तथा रसायने मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाठविले आहे.

निवेदनानुसार, मागील सव्वा वर्षापासून कोरोना महारोगामुळे जनता आर्थिक संकटात सापडली आहे. लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहे. उद्योग-व्यवसायात घट झाली आहे, त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. लोकांची आवक कमी झाल्याने दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे. अशा वेळी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमती सातत्याने वाढविल्या आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च वाढला, उत्पादन खर्चात वाढ झाली. परिणामी महागाई वाढून लोकांचे हाल झाले आहेत.कोरोना महारोगाच्या काळात पेट्रोल, डिझेल व गॅस तथा इतर साहित्यावर केलेली दरवाढ अन्यायजनक आहे. ही दरवाढ तात्काळ कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी सुनील तिवारी, दीपा कशीवर, अर्चना शहारे, वसंतराव गवळी, सुनील भोंगाडे, रवी भांडारकर आदि उपस्थित होते.