एरंडोल येथील रासपच्या बैठकीत कोरोना योध्दांचा सत्कार व निवडणुकीवर चर्चा

0
9

एरडोंल,दि.29ः एरंडोल तालुका व शहर राष्ट्रीय समाज पक्षाची येणाऱ्या नगरपालिका ,जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात(दि.28) आढावा बैठक घेत चर्चा करण्यात आली.त्याचप्रमाणे एरंडोल नगरपालिका कर्मचार्यांनी कोरोना महामारीच्या वेळेत जे रुग्ण दगावले त्यांच्यावर जिवाची पर्वा न करता परिवाराच्या विचार न करता या अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी खरे कोरोना योध्दा ठरल्याने कर्मचाऱ्यांच्या तालुका व शहर राष्ट्रीय समाज पक्षाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी हरिभाऊ मुलचंद आठवले,संतोष भिका कोकरे,सचिन पटवणे,मुकेश जाधव,शंकर गोयल,चंदन जाधव, अविनाश जाधव,संतोष चव्हाण,अनिकेत पवार,रोहित आठवले,गोलू मराठे,आकाश आठवले,राजेश रमण गोंडाळे आदींनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करण्यात आला,तसेच नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी निंबा खंडू पाटील विखरण रासपा रिक्षा युनियन सेल तालुकाध्यक्ष, रोहिदास माने काटकर उमर्दे गन प्रमुख,अक्षय सखाराम बारेला मुंग पाट एरंडोल आदिवासी सेल तालुकाध्यक्ष,दिनेश पद्माकर महाजन रिंगणगाव व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष,अभिमन्यु प्रताप शिवदे म्हसावद जळगाव ग्रामीण तालुका अध्यक्ष,मिस्तरी शेख कासिम शेख रहीम मोहन दिन अल्पसंख्या तालुकाध्यक्ष,मुदत सर खान सरपंच खान एरंडोल शहर अल्पसंख्याक अध्यक्ष तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रमुख पाहुणे संतोष वेडू वंजारी, दिलदार बारेला, गणेश हरिचंद बारेला, अभयसिंग सोनू तालुका उपाध्यक्ष खेडगाव तांडा, शिवदास रामजी पवार गट प्रमुख ताडे, उतरान दत्तात्रेय भिला मोरे रिंगणगाव, दिनेश पद्माकर महाजन, अंकुश मोहन सोनवणे, पद्मालय रोहिदास माने, काटकर उमर्दे व तसेच माजी मंत्री महादेव जानकर,महासचिव बाळासाहेब दोडतले,प्रदेशाध्यक्ष रत्नाकर गुट्टे, आमदार व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव दांडगे पाटील राजाभाऊ यांच्या आदेशावरून एरंडोल तालुका अध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी,डॉ.पी.जी.पळशीकर व संतोष वंजारी यांच्यामार्फत नियुक्ती करण्यात आली.सूत्रसंचालन संतोषभाऊ वंजारी यांनी केले व आभार तालुकाध्यक्ष राजू चौधरी यांनी मानले.