33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता बॅटरी चोरीचे प्रकरण उघड चोरट्यांची टोळी गजाआड

बॅटरी चोरीचे प्रकरण उघड चोरट्यांची टोळी गजाआड

0
82

blank

अर्जुनी मोर-स्थानिक संविधान चौकात उभा असलेल्या दोन ट्रॅक्टरची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी ५ एप्रिल रोजी चोरून नेली होती. या घटनेची नोंद होताच अर्जुनी मोरगाव पोलिसांनी शोधचक्र फिरवून अवघ्या दोन दिवसात या प्रकरणाचा उलगडा केला. दोन चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. लखनसिंग टाक व बलदेवसिंग टाक दोन्ही रा.सिंगलटोली अर्जुनी मोरगाव असे आरोपींची नावे आहेत.
सविस्तर असे की, संविधान चौकात उभ्या असलेल्या दोन ट्रॅक्टरची बॅटरी काढून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या घटनेची नोंद ६ एप्रिल रोजी अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली. पोलिस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना कामाला लावले. दरम्यान गोपनिय माहितीच्या आधारावर सिंगलटोली येथील लखनसिंग टाक व बलदेवसिंग टाक या दोघांन ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी बॅटरी चोरी केल्याची कबूली दिली.
यावरून आरोपीकडून ९ हजार रुपए किंमतीच्या दोन बॅटर्‍या हस्तगत करण्यात आल्या. चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना ११ एप्रिलपयर्ंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही यशस्वी कारवाई पोनि चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संभाजी तागड, सोमनाथ कदम, राहुल चिचमलकर, प्रविण बेहरे, रमेश सेलोकर श्रीकांत मेर्शाम, गौरीशंकर कोरे यांनी केली.

blank