भारनियमनाविरोधात आ. पटोलेंच्या निवासस्थानासमोर ठिय्या

0
48

 साकोली-भारनियमन बंद करून नियमित ८ तास कृषीपंपाला वीज पुरवठा सुरू करण्यासाठी लाखांदूर तालुक्यातील बारव्हा, जैतपुर, खोलमारा, तावशी, साखरा व चिकना येथील सुमारे दोनशे शेतकर्‍यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले यांच्या सुकळी येथील निवासस्थानासमोर १0 एप्रिलला ठिय्या आंदोलन केले. लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
भारनियमनामुळे आठवडाभरापासून एक तासही पिकांना पाणी मिळत नसल्याने पिक उन्हाने वाळत चालले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे निवासस्थानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत महावितरण कंपनी लेखी आश्‍वासन देत नाही तोपयर्ंत येथेच भोजन बनवून ठिय्या मांडण्याचा निर्धार केला होता.
दरम्यान, आ. पटोले यांचे स्वीय सहाय्यक यांनी आंदोलनकर्त्यांसमोरच अभियंता यांना फोन लावला. परंतु, महावितरणचे अधिकारी जोपयर्ंत येथे येऊन अखंडीत ८ तास पुरवठय़ाचे लेखी आश्‍वासन देत नाही. तोपयर्ंत ठिय्या सुरूच ठेवण्याचा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला होता. दरम्यान, वीज वितरण अभियंत्यांनी ८ तास वीज देण्याचे आश्‍वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. चंद्रशेखर टेंभुर्णे यांचे नेतृत्वात गोपाल झोडे, पतिराम झोडे, निलकंठ चौधरी, रवि सोनवाने आणि जैतपुर, खोलमारा, तावशी, साखरा, बारव्हा व चिकना येथील दोनशे शेतकरी यावेळी उपस्थित होते.