तलाठय़ास २ हजारांची लाच स्वीकारताना अटक

0
81

चामोर्शी- शेतजमिनीचे फेरफार करण्याच्या कामाकरिता तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच घेतांना दोटकुली येथील तलाठय़ास ११ एप्रिल रोजी रंगेहात अटक करण्यात आली. नामदेव हरीभाऊ चंदनखेडे (४६) तलाठी साजा क्र. १२ तलाठी कार्यालय दोटकूली असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदाराच्या भावाच्या नावे खरेदी केलेल्या शेजमिनीचे फेरफार करण्यासाठी आरोपी नामदेव चंदनखेडे याने तक्रारदाराकडे ५ हजार लाचेची मागणी केली. पूर्वी ३ हजार रूपये घेतले. त्यानंतर दोन हजार रूपये पडताळणीनंत देण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज ११ एप्रिल रोजी सापळा रचून आरोपी नामदेव चंदनखेडे यास २0 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राकेश ओला. अपर पोलिस अधीक्षक मधूकर गिते यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, सहाय्यक फौजदार प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु धोटे, पोना राजेश पद्मगिरवार, श्रीनिवास संगोजी, मपोशी विद्या मशाखेत्री, चापोहवा तुळशिराम नवघरे यांनी केली