कास्ट्राईब शिक्षकांच्या समस्या निकाली काढणार- कादर शेख

0
35

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना निवेदन.

गोंदिया,दि.12ः शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी १ एप्रिल ला कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा गोंदिया चे अध्यक्ष संजय उके यांच्या नेतृत्वात कादर शेख शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
नव्यानेच रुजू झालेले कादर शेख शिक्षणाधिकारी (माध्य.) यांचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल जन्मदिवस देशवासीयांचा सण संपूर्ण देशात मोठ्या हर्ष उल्हासात साजरा करण्यात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या “भारतीय चलनाच्या समस्या” ( THE PROBLEM OF THE RUPEE) ग्रंथ भारतीय रिजर्व बँकेचा पाया रचण्यासाठी वापरण्यात आला. बाबासाहेबांनी सुचवलेली मार्गदर्शक तत्वे, कार्यप्रणाली, संकल्पना, रूपरेषेवर १ एप्रिल १९३५ ला भारतीय रिजर्व बँके ची स्थापना होऊन भारतीय रिजर्व बँक आणि भारतीय अर्थव्यवस्था डौलाने उभी आहे.
त्या ज्ञानसूर्याच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती १४ एप्रिल २०२२ पूर्वी सर्व शिक्षक/ कर्मचारी/अधिकाऱ्यांचे मार्च २०२२ महिन्याचे वेतन करण्यात यावे व इतरही समस्यांवर चर्चा करण्यात आली.सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन साहेबांनी दिले.
शिष्टमंडळात कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, सौ.उमा गजभिये, अजय शहारे, आशिष वंजारी, उत्क्रांत उके, अमित गडपायले, अविनाश गणवीर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.