अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी शिक्षकाची अखेर जामिनावर मुक्तता

0
66

👉👉अॅड.विवेक उर्फ बंड्या मांडकुलकर यांनी केला युक्तिवाद

सिंधुदुर्ग:-अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या जगन्नाथ वासुदेव वजराटकर वय ४४ राहणार वजराट या संशयित शिक्षकाला जिल्हा विशेष न्यायाधीश आर.बी.रोटे यांनी २५ हजारांचा संशर्त जामीन मंजूर केला आहे.तर संशयित आरोपीच्या वतीने अॅड.विवेक उर्फ बंड्या मांडकुलकर यांनी काम पाहिले.

सविस्तर माहिती अशी की,जगन्नाथ वासुदेव वजराटकर प्राथमिक शिक्षक असुन, त्याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार वेंगुर्ले पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.त्यानुसार संशयित असलेल्या या शिक्षकावर भादंवि कलम ३५४ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ व १२ नुसार पाॅस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी संशयित शिक्षकाला १२ एप्रिल रोजी अटक केली होती.सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने पोलिसांची पोलिस कोठडीची मागणी फेटाळून लावत त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान संशयित असलेल्या या शिक्षकांने न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.या अर्जावरील सुनावणीत संशयित आरोपीचे वकिल अॅड.विवेक उर्फ बंड्या मांडकुलकर यांनी या केस संदर्भात सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तीवाद केल्याने अखेर तो युक्तिवाद ग्राह्य मानून,विशेष न्यायालयाने त्या शिक्षकाची अखेर २५ हजारांचा संशर्त जामीन मंजूर केला.