अमरावतीत शिवसैनिकावर हल्ला; शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर गोळीबार

0
77

अमरावती– शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखावर गोळीबार करण्यात आला आहे. उपजिल्हाप्रमुख योगेश घारड यांच्यावर हा हल्ला करण्यात आला असून, त्यात ते गंभीर जखमी झाले आहे. अमरावती शहराच्या वरुडमध्ये शनिवारी रात्री 9 वाजेदरम्यान यांच्यावर जिवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

या जिवघेण्या हल्ल्यात घारड यांच्या मांडीला गोळी लागली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक देखील केली आहे. तर राहुल तडस याचा शोध सुरू असून, पोलिस बारकाईने त्याचा तपास करत आहे. जागेच्या जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. योगेश घारड यांना उपचारासाठी नागपुर येथे हलवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे. या घटनेनंतर वरुड वरुड शहरामध्ये कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.