शिरोली येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर किसान सेवा पॅनलचे वर्चस्व

0
28

अर्जुनी-मोर -तालुक्यातील शिरोली येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेवर किसान सेवा पॅनलचे 13 पैकी 11 उमेदवार निवडून आल्याने या संस्थेवर किसान सेवा पनलने वर्चस्व सिद्ध केले आहे् दिनांक 23 एप्रिल रोजी या सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातून प्रदीप मस्के तर भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून दयाराम शंकर मेश्राम तर अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गटातून विलास शिवराम रामटेके तर महिला राखीव प्रतिनिधी गटातून अहिल्याबाई गौतम व देवेंद्राबाई दिगंबर मस्के तर सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी गटातून राजन डोंगरे रतिराम पंद्रे शिवदास मस्के माधवराव मस्के विनोद मेश्राम प्रभाकर लंजे असे 11 उमेदवार निवडून आणून किसान सेवा पनलने आपले वर्चस्व सिद्ध केले तर विरोधी गटाचे जितेंद्र मेश्राम व रामदास वाघमारे हे निवडून आले आहे एकंदरीत या सेवा सहकारी संस्थेवर भाजप समर्पित किसान सेवा पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन प्रदीप मस्के विवेक मस्के वामन मस्के हेमराज मस्के सुखदेव पुस्तोडे ममता लंजे प्रमिला म्हणजे गोपिका शेंडे जाईबाई देशपांडे उषा मेश्राम अशोक मस्के प्रकाश मस्के आनंदराव मस्के आत्माराम मस्के रूपचंद खोब्रागडे नितीन खोब्रागडे धम्मदिप देशपांडे यांनी अभिनंदन केले आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संदीप बुरले यांनी काम पाहिले