युवकांनी वाचनाची आवड निर्माण करावी : नागराज मंजुळे

0
23

बुलडाणा,-: एैतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभलेल्या बुलडाणा जिल्ह्यात विचारांचा जागर करण्यासाठी वामनदादांची गाणी जगण्याची उर्जानिर्माण करून देते. लोकगित साहित्याचा माध्यमातून पुढच्या पिढीला वाचनाची आवड झाली पाहिजे. शारिरीक तंदुस्तीला व्यायमाची तर मेंदूला वाचनाची सवय जडली पाहिजे. मॉ जिजाऊची जन्मभूमी  सिंदखेडराजा, जागतिक दर्जाचे लोणार सरोवराचे जतन करून पर्यटन स्थळ विकसीत होईल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असा संदेश कवी दिग्दर्शकर्श नागराज मंजुळे यांनी दिला.

महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उदघाटन 23 एप्रिल रोजी गर्दे वाचनालयाच्या सभागृहात पार पडले.या प्रसंगी अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यीक अर्जून डांगळे (मुंबई),उदघाटक नागराज मंजुळे, साहित्यीक प्रा. डॉ.सदानंद देशमुख,स्वागताध्यक्ष रविकांत तुपकर, कार्याध्यक्ष रविकांत तुपकर,कार्याध्यक्ष दिलीप जाधव,मुंबई मंत्रालय सह सचिव सिद्धार्थ खरात, शाहीर चरण जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. मराठी चित्रपट दिग्दर्शकर्श नागराज मंजुळे यांनी साहित्य संमेलन म्हणजे नेमके काय करायचे हे युवा पिढीने समजून घेतांना संमेलनात विचारांचा जागर होतो. सगळेजण वाचत व लेखन करीत नाही. भिमाच्या लेखणीने भारतातल्या सगळया माणसाठी असल्याने ती लेखणी कशी देखणी झाली हे लोकगिताच्या माध्यमातूनतू वामनदादांनी दाखवून दिले. त्याच्या कतृत्तृवाची झलक बुलडाणाच्या
सांस्कृतिक कार्यक्रमातून दिसते.त्यामुळे त्यांची जन्मभूमी हिच आहे. माणूस पैसापेक्षा आठवणीने श्रीमंत समृद्ध होतो. वामनदादा अण्णाभाऊ साठे, विठ्ठल उमप, आनंद व मिलींद शिंदे यांनी आपल्या वाणीतून समाजसंवाद साधून विचारांचा जागर केला.आजच्या पुस्तक दिनी पुढच्या पिढीने वाचनाची आवड निर्माण करावी भविष्यात बुलडाणाच्या निसर्गरम्य परिसरात चित्रपटाच्या चित्रीकरणास नक्कीच येईल असे नागराज मंजुळे यांनी आवर्जून सांगितले.