मग्रारोहयोच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास -आमदार मनोहर चंद्रिकापूरे

0
16

सडक अर्जुनी,दि.03ः-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विशेष निधीमधून अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदार संघात ९ कोटीची ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट रस्त्याची कामे आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांनी मंजूर केली.त्या मंजूर कामापैकी प्रत्येकी रु. ५० लक्षची फुटाळा, कोसबी , तिडका या ग्रामीण भागातील विविध विकास कामांचे भूमीपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते आज 3 मे रोजी करण्यात आले.

या निधीतून ग्रामीण भागात विकासकामे केली जात आहेत. या निधीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळाली आहे.अर्जुनी/मोरगांव विधानसभा मतदारसंघात अनेक भागांचा अद्यापही अपेक्षित विकास झालेला नाही. या भागांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी चांगला निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन आमदार चंद्रिकापूरे यांनी दिले.

आमदार चंद्रिकापूरे पुढे म्हणाले की, अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत, काही कामे प्रस्तावित आहेत. लवकरच भूमिपूजन करून या कामांनाही सुरुवात होणार आहे. ग्रामीण भागातील विकासासाठी शासनाशी सातत्याने पत्रव्यवहार करून निधी उपलब्ध करून दिला. काही काम प्रस्तावित आहेत. तेही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.

यावेळी शिवाजी गहाणे प.स.सदस्य,सपना नाईक प.स.सदस्य, सुनीता गोबाडे सरपंच फुटाळा, अर्जुन गहाणे उपसरपंच, नाशिका शहारे सरपंच कोसबी, राकेश कोरे उपसरपंच, वनिता भोयर सरपंच तिडका, गंगाधर सोनवाने उपसरपंच, मुन्ना देशपांडे, नंदू गहाणे, वसंत गहाणे, सचिन गहाणे, मनोज तागडे, भूमिता भोंडे, विक्की गहाणे, लता गहाणे , रेवता मेश्राम, लालचंद नेवारे, सुखलाल राऊत, जयश्री वैद्य, जयराम गहाणे, ज्ञानदेव गहाणे, मंगेश कापगते व तिडका, फुटाळा, कोसबीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

नंतर ग्राम पंचायत सभागृहात ग्रामस्थांशी संवाद साधले,गावाच्या विकासात सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे . गावच्या सरपंचानी गावाच्या समृद्धीसाठी प्रयत्न केले तर निधीची कमतरता भासणार नाही . विविध माध्यमातून विकास निधी मिळतो . काम करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे . सबब नरेगा अंतर्गत ग्रामपंचायतींनी वार्षिक आराखडा तयार करावा अशी सूचना केली.