पोलिस दलातील अधिकारी नलिनी शिंदे हिला गुरुवारी २ लाखांची लाच घेताना पुण्यात रंगेहाथ पकडले

0
12

*सिंधूदुर्ग :-सिंधुदुर्गनगरी येथे पाेलिस अधीक्षक भवनातील महिला अत्याचार निवारण कक्षात कार्यरत असणार्‍या नलिनी शंकर शिंदे या साहाय्यक पोलिस निरिक्षकाला पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

*👉🟥👉पुणे निगडी येथील एका ६२ वर्षीय महिला डॉक्टरचा गर्भलिंगनिदान हॉस्पिटलला सील लावणे व कारवाई करण्याच्या कामात सहकार्य करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलिस दलात महिला अत्याचार निवारण कक्षात कार्यरत असणार्‍या सहायक पोलिस निरीक्षक नलिनी शिंदे याने सदर महिला डॉक्टरकडे ५ लाख रुपयांची लाच मागितली होती त्यावर य २ लाख रुपयांची तडजोड होऊन ही रक्कम गुरुवारी सायंकाळी स्वीकारताना तिला पुणे येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

*👉🅾️👉पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी ही कारवाई केली आहे.*