मोटारपंप चोरणारी टोळी अटकेत : चार आरोपींसह खरेदी करणार्‍या दोघांना अटक

0
19

तुमसर- शेतकर्‍यांच्या इलेक्ट्रिक पाण्याची मोटारपंप चोरी करून क्षुल्लक भावात विकणार्‍या चार चोरांना तुमसर तालुक्यातील आष्टी गावातून गोबरवाही पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून एक दोन नव्हे तर तब्बल २२ मोटारपंप हस्तगत हस्तगत करण्यात आले.
कृषिप्रधान देशातला शेतकरी पूर्वीपासून शेती उत्पन्न घेण्यासाठी संघर्ष करीत आलेला आहे. निसर्गाची साथ, बी बियाणे, शेती अवजार यावर शेती उत्पन्न अवलंबून असते. आधुनिक शेतीची कास धरलेल्या शेतकर्‍यांसाठी मोटरपंप अगदीच जिव्हाळाचा विषय. परंतु अवघ्या शिवाराला पाणी देणार्‍या मोटरपंप चोरीचे प्रकार सध्या वाढत चालले आहेत. पदरचे पैसे खर्च करून आणलेली मोटरपंप जेव्हा कुणी चोरून नेते तेव्हा शेतकरी मात्र हवालदिल होतो.
असाच प्रकार पोलिस ठाणे गोबरवाही हद्दीतील परिसरात होत होता.अनेक ठिकाणी मोटरपंप चोरीला जाण्याच्या घटना घडत होत्या. काही जण पोलीस ठाण्यात तक्रार देत तर काही दुर्लक्ष करीत.
ठाणेदार दीपक पाटील यांनी चोरी करणार्‍या टोळीचा छडा लावण्याचे ठरविले. पोलिस ठाण्यातील पथक कामाला लागला. गुप्त खबरी जागोजागी पेरले.अनेक दिवसांच्या प्रयत्नांना शेवटी यश आले. एका खबर्‍याकडून मोटरपंप विक्री करणार्‍या टोळीची माहिती मिळाली. गोबरवाहीचे पोलिस उपनिरीक्षक करंगामी, पोलिस हवालदार सोळंखी, मनोज साकुरे, पोलिस शिपाई रवी जायभाई, विष्णू जायभाई, नारायण कायंदे यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.आरोपीकडून इतर तीन आरोपींची नावे उघड झाली. आष्टी गावातील चोरी करणारे चार आरोपी व मोटरपंप विकत घेणारे दोन आरोपी असे एकूण सहा आरोपी जेरबंद झाले. त्यांच्याकडून एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल २२ मोटरपंप जप्त झाल्या.
अनेक दिवसापासून सक्रिय असणारी टोळीचा पदार्फाश करण्यात ठाणेदार दीपक पाटील यांना यश आले. त्यांच्या पथकाने त्यांच्या नेतृत्वाखाली रात्रंदिवस मेहनत घेतली व शेतकर्‍यांना दिलासा दिला. पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी पोलीस स्टेशन गोबरवाही येथे भेट देऊन ठाणेदार दीपक पाटील व त्यांच्या स्टाफचे कौतुक केले. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व पोलीस उपविभागीय अधिकारी रीना जनबंधु यांनीही टीमचे कौतुक केले.