दारूमुक्तीची मशाल पेटवून धावले ८२ गावकरी

0
18

गडचिरोली-गावातील अवैध दारूविक्री विरोधात शक्तिप्रदर्शन करण्याच्या उद्देशाने मुक्तिपथ व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने कोरची तालुक्यातील सावली व जांभळी येथे मुक्तिपथ मॅराथॉन दौड स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्ही गावातील एकूण ८२ महिला, पुरुष व युवक-युवतींनी दारूमुक्तीची मशाल पेटवून स्पर्धेत सहभाग घेतला होता.
सावली येथे आयोजित मुक्तीपथ मॅरेथॉन स्पर्धेत ४५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात महीला २0, पुरुष,४, युवक १७ व ४ युवतीचा समावेश होता. या स्पध्रेची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दारूमुक्तीची मशाल पेटवून करण्यात आली. कार्यक्रमाचे उद््घाटन सरपंच सुनील सयाम यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गाव संघटनेचे अध्यक्ष तेजलाल सिंद्राम होते. यावेळी राध्येशाम मडावी, प्रभुदास लाडे, मनोहर मेर्शाम, नरेश मडावी, गोपाल मेर्शाम, गीता मेर्शाम, इंदिरा सिंद्राम, दुर्गा मेर्शाम, मुख्याद्यापक केरामी, सहायक शिक्षक मिसरा, आंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका उपस्थित होते. विविध गटातून घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम आलेले विष्णु सिंद्राम, रघुनाथ मेसराम, निलम कुमरे, समारीन नैताम यांचा मान्यवरांच्याहस्ते गौरव करण्यात आला.
जांभळी येथील स्पध्रेचा शुभारंभ सनु मडावी यांच्याहस्ते दारूमुक्तीची मशाल पेटवून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावसंघटनेचे सचिव सुधाराम मडावी होते. यावेळी ग्रामसभा अध्यक्ष ईश्‍वर कुमरे, ग्रामसेवक आर.जे.दिहारे, मुख्याध्यापिका पी.आर.बूद्धे, त्रिवेनी गायकवाड, एस.के.लांडगे यांच्यासह गावकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत ३७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांक पटकाविले युवक विनोद उसेंडी, युवती अंजली कोरचा, महीला विभा कोरेटी, पुरुष सहाजु हिडामी यांचा मुक्तिपथ गाव संघटनेच्या वतीने मेडल व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, स्पध्रेच रूपांतरण सभेत करून अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी चर्चा करण्यात आली. संचालन गाव संघटनेचे अध्यक्ष सुनील मडावी यांनी केले.