तिरोडा पंचायत समितीचे उपसभापती यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीमधून 24 हजार चोरून चोर झाले पसार

0
16

पोलिसांची शोधमोहीम सुरू, कॅनेरा बँक व परिसरात चोरांच्या संशयास्पद हालचाली

तिरोडा, दि.30 : तिरोडा पंचायत समितीचे उपसभापती हुपराज रामजी जमईवार (वय 52) यांच्या बजाज सीटी 100 या मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवलेले 24 हजार रुपये काढून चोर पसार झाले. ही घटना शुक्रवार, 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास युनियन बँक चौक ते महात्मा गांधी पुतळा चौक दरम्यान रस्त्यावरील शहीद स्मारकाजवळ असलेल्या गटशिक्षणाधिकारी यांच्या गट साधन केंद्रासमोर घडली. (Theft of cash)

उपसभापती
तिरोडा-गोंदिया महामार्गावरील कॅनेरा बँक शाखा तिरोडा

सविस्तर वृत्त असे की, तिरोडा पंचायत समितीचे उपसभापती हुपराज रामजी जमईवार हे काल शुक्रवार, 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वाजता पैशाची गरज असल्याने तिरोडा-गोंदिया महामार्गावरील कॅनेरा बँकेत गेले. त्या बँकेसमोर आपली मोटारसायकल बजाज सीटी 100 पार्क करून ते बँकेत गेले. अर्ध्या तासाने बँकेतून 24 हजार रुपये विड्राल करून ती रक्कम आपल्या मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये असलेल्या फाइलमध्ये ठेवली.

त्यानंतर ते युनियन बँक चौक ते गांधी पुतळा चौक या रस्त्यादरम्यान असलेल्या गट साधन केंद्रासमोर आपली मोटारसायकल ठेवून काही कामानिमित्त त्या कार्यालयात गेले. जवळपास 15 ते 20 मिनिटांनी ते बाहेर आले. तेव्हा त्यांना त्यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीच्या वरील झाकन तंतोतंत तसाच लागून असल्याचे दिसला. मात्र डिक्कीचा लॉक हा ढिला असल्याचा आढळून आला. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी डिक्कीच्या वरील झाकन उघडून पाहिले असता सर्व कागदपत्र व्यवस्थित होते, पण तेथे ठेवलेले 24 हजार रुपये आढळले नाही.

त्यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीचा लॉक तोडून त्यामध्ये ठेवलेले नगदी 24 हजार रुपये अज्ञात चोराने चोरून नेले. अशी तक्रार उपसभापती जमईवार यांनी तिरोडा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तात्काळ कॅनेरा बँक गाठून तेथील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासले. त्यात त्यांना विड्राल करणार्‍या ग्राहकांवर असलेल्या काही संशयास्पद इसमांच्या नजरा व हालचाली आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार बावणे करीत आहेत.