लोककलेतून जोपासली जात आहे संस्कृती – माजी आमदार राजेंद्र जैन

0
14

गोंदिया- तालुक्यातील ग्राम तांडा व आसोली येथे दिवाळीच्या पावन पर्वावर मंडई निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. विदर्भात फार वर्षापासून समाजाला एकत्र आणून मनोरंजनाच्या माध्यमातून समाज जागृती व समाजाला सुसंस्कृत करण्याची परंपरा जोपासली जात आहे. गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यात लोक कलेला जिवंत ठेवण्यात आले आहे. दिवाळीनंतर चा काळ हा बळीराजाच्या विश्रांतीचा काळ असतो त्यामुळे बळीराजा आपल्या कुटुंबासह लोककलेचा आनंद लुटून त्या माध्यमातून ही संस्कृती आत्मसात करतो. म्हणूनच झाडीपट्टीतील ही लोककला संस्कृतीचे साधन ठरले आहे असे प्रतिपादन जैन यांनी केले.

या उद्घाटन प्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, जगदीश बहेकार, अखिलेश शेठ, भास्कर रहांगडाले, एन जी बिसेन, चेतन सिंह परिहार, अशोक गौतम, हसन सिंह सोमवंशी, सुरेंद्रसिंह परिहार, खेमराज पटले, श्रीमती विमलताई बिसेन, श्रीमती सुरेखाबाई खांडेकर, सौ. मोरेश्वरी बिसेन, प्रिया बिसेन, शैलेश वासनिक, सयाराम भेलावे, पुरण उके, धर्मेंद्र गणवीर, यशपालसिंह सोमवंशी, मूलचंद बिसेन, जितेन्द्र बिसेन, जे एन बिसेन, ठूनाजी बिसेन, भयंकर बिसेन, बाकिलाल पारधी, टोलिराम बिसेन, खुमेंद्र बिसेन, रोमेंद्र बिसेन, कुवरलाल बिसेन, जितेन्द्र खांडेकर, भाऊलाल गौतम, उमेन्द्र रहांगडाले, होमचंद बीसेन, दिपक पटले, भाऊलाल बिसेन, केवल उके, हेमराज ठाकूर, प्रमोद रहांगडाले, अशोक पारधी, कोमल बिसेन, रामेश्वर भगत, घनश्याम बिसेन, तीरथ चव्हाण, नारायण बिसेन, गगन बिसेन सहित मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.