हत्या करणार्‍या दोघांना आजीवन कारावास  

0
29

गोंदिया,: जिल्हा न्यायाधिश-1 तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश नितीन खोसे यांनी 18 जानेवारी रोजी खुनाच्यागुन्हयातील दोन गुन्हेगांराना आजीवन कारावास आणि 5 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. विशाल विनोद लांजेवार (24) व अनमोलमुनेमु नेश्वर उके (25) रा.गौतमनगर असे त्यांची नावे आहेत.शहरातील गौतमनगर येथे 2017 साली नझमा हमीद शेख यांचा मुलगा तौसीफ हमीद शेख (22 वर्ष) याची हत्या केली होती. याप्रकरणी शहरपोलिसांनी कलम 302, 34 भादंविअन्वये गुन्हा नोंद करुन दोन्ही आरोपींना अटक केली. दरम्यान आरोपीविरुध्द साक्ष पुरावे गोळा करूनतपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात दोन्ही गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायाधिश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश,नितीन ज्ञानेश्वर खोसे यांनी आरोपींना आजीवन कारावास  व प्रत्येकी 5 हजार रुपयांची द्रव्यदंडाची शिक्षा, तसेच दंड नभरल्यास 1 वर्ष अतिरीक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक मनोहर दाभाडे यांनी केला. खटल्याचो युक्युतीवाद जिल्हा सरकारी अभियोक्ता महेश चांदवाणी यांनी केले.तर न्यायालयीन कामकाज मपोहवा. टोमेश्वरी पटले यांनी पाहिले. उत्कृष्ट तपास पूर्ण करणार्‍या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचे पोलिसअधीक्षक निखील पिंग, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, गोंदियाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल ताजणे, पोलिस निरिक्षकचंद्रकांत सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले.