‘समृद्धी’वर अपघात; भरधाव कार उलटली, युवतीचा मृत्यू

0
25

नागपूर-‘समृद्धी’ महामार्गावरील अपघाताची मालिका अद्यापही कायमच आहे. नागपुरातील लग्नसमारंभ आटोपून गावी परतणाऱ्या युवतीचा समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली. यात पूजा प्रेमचंद (रवी) दरवळकर (२५) रा. वायगाव (निपाणी) हिचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. जखमींवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अरुणा प्रकाश राऊतकर, अनुप प्रकाश राऊतकर, अशी जखमींची नावे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पूजाच्या मामेबहिणीचे नागपूर येथील मानेवाडा येथे लग्न होते. याकरिता ती आई-वडिलांसह नागपुरात आली होती. लग्नानंतर ती नागपुरात थांबली आणि आई-वडिलांना परत जाण्यास सांगितले. आज सकाळी ती मावशी अरुणा प्रकाश राऊतकर व मावस भाऊ अनुप प्रकाश राऊतकर, रा. धामणगाव, शिवाजी वॉर्ड, जि.अमरावती यांच्यासह एमएच २७-एसी-९७४७ क्रमांकाच्या वाहनाने परतीला निघाली. केळझरलगत समृद्धी महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली. यात पूजाचा मृत्यू झाला. पूजा पुणे येथील संगणक कंपनीत नोकरी करीत होती.