जिल्हा परिषद शिक्षकांचा गावकऱ्याकडून सत्कार

0
18

पालांदूर /जमी-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेकरी केंद्र पालांदूर जमी येथे कार्यरत मुख्याध्यापक मोहन बिसेन व सहाय्यक शिक्षक महेंद्र रहांगडाले यांचा शाळेतील उत्कृष्ट कार्याबद्दल टेकरी ग्रामवासीयांकडून सत्कार करण्यात आला. 2019 पासून हे दोन्ही शिक्षक या शाळेत कार्यरत असून त्यांनी शाळेच्या कार्यासोबत गावातील सामाजिक कार्यात सुद्धा उत्कृष्ट कार्य केले आहे.त्यामुळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य नुरचंद नाईक यांच्या संकल्पनेनुसार गावातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सौ जयवंताताई हरदुले, केंद्रीय मुख्याध्यापक शरद पटले जनबंधू तसेच गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.