महिलेचा दगडाने ठेचून खून करणाऱा आरोपी अवघ्या काही तासातच पोलिसांच्या जाळ्यात

0
83

गोंदिया,दि.05ः सालेकसा पोलीस ठाणें अंतर्गत पानगाव तलावाच्या काठी दगडाने ठेचून महिलेचा खून करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन अवघ्या काय तासात स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.खून करण्यात आलेल्या महिलेची ओळख पटल्यानंतर गुन्हेगाराचा शोध करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या व तांत्रिक माहिती च्या आधारावरून गुन्हेगाराचा शोध घेत लखनलाल मंगरू लिल्हारे(वय 39,रा.परसवाडा,जिल्हा बालाघाट (मध्यप्रदेश)) यास ताब्यात घेण्यात आले असता त्यांने खुनाची कबुली दिली.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दि.04/03/2023 रोजीचे पहाटे सालेकसा पोलिसांना पानगाव ते सालेकसाकडे येणाऱ्या पानगाव तलावाच्या काठावर एका अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खून केल्याची माहिती मिळाली.लगेच सालेकसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाबासाहेब बोरसे यांनी पोलीस स्टाफसह घटनास्थळावर पोहोचून प्रत्यक्ष पाहणी करुन मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पाठविले.दरम्यान पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, यांनी अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून खून करण्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता खून करणाऱ्या गुन्हेगाराचा तात्काळ शोध घेऊन खुनाच्या गुन्ह्याचा तत्काळ उलगडा करून गुन्हेगार आरोपीस तात्काळ अटक करण्याबाबत निर्देश देऊन वेगवेगळी पथके तयार करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे सालेकसाचे पथक व स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पोलीस निरीक्षक श्री दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली व महिलेची ओळख पटवून खून करणाऱ्या गुन्हेगाराचा शोध मोहीम राबविण्यात आली होती. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस खुनाच्या गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल विचारपूस व चौकशी करण्यात येवून , सदर आरोपीनेच खुन केल्याचे निष्पन्न होत असल्याने पुढील कायदेशीर कारवाई करीता सालेकसा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेले असून आरोपीस गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.पुढील तपास सालेकसा पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे हे करीत आहेत.

खुनाच्या गंभीर गुन्ह्यांचा अवघ्या काही तासात उलगडा करून आरोपीस तात्काळ अटके ची कामगिरी माननीय वरिष्ठांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  दिनेश लबडे यांचे नेतृत्वात सपोनि. विजय शिंदे पोउपनि, महेश विघ्ने, जीवन पाटील, मपोउपनी वनिता सायकर, पोलीस अंमलदार पोहवा विठ्ठल ठाकरे ,चेतन पटले, इंद्रजीत बिसेन, तुलसीदास लुटे, दिक्षित दमाहे, पोशि.संतोष केदार, हंसराज भांडारकर, चापोहवा लक्ष्मण बंजार, चापोशि. मुरली पांडे यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.