माजी खासदार तथा आपचे प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ राठोड यांचा आप ला रामराम

0
50

यवतमाळ- माजी खासदार तथा आप पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ राठोड यांनी आप पक्षाचा राजीनामा दिला असून तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या भारतीय राष्ट्रीय समिती पक्षात प्रवेश केला आहे. काल ४ मार्च रोजी हरिभाऊ राठोड यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के .चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात प्रवेश केला.दोन दिवसापूर्वी हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात येथे आपच्या कार्यकर्त्यांनी भाव पडल्याने सरकारच्या विरोधात कापूस जलाव आंदोलन केले होते.त्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्यामुळे आपच कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. २००४ते २००९ मध्ये हरिभाऊ यवतमाळचे भाजपचे खासदार होते. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००९ मध्ये काँग्रस पक्षाकडून त्यानी लोकसभा. निवडणूक लढविली मात्र शिवसेनेच्या भावना गवळी यांनी त्यांचा पराभव केला. पुढे त्यांना काँग्रेसच्या वतीने विधानपरिषद मध्ये संधी मिळाली. २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली नाही, त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला व शिवसेनेला पाठिंबा दिला. काही महिन्यांपूर्वी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थिती मध्ये आप पक्षात प्रवेश केला. केजरीवाल यांनी त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षाची जबाबदारी सोपविली होती.पण त्यांनी पुन्हा पक्षांतर करून के. चंद्रशेखर राव यांच्या बरोबर गेले. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी आप पक्ष चांगला आहे,पण शेतकऱ्याची बाजू घेणारा के.चंद्रशेखर राव यांचा पक्ष जास्त चांगला वाटल्याने आपण त्यांच्या पक्षात प्रवेश घेतल्याचे सांगितले.