महाराष्ट्राचा अर्थसंकल्प राज्याला प्रगतीवर नेणारा-गोंदियातील लोकप्रतिनीधींच्या प्रतिक्रिया

0
57

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प देशाच्या “आर्थिक महासत्ता” होण्याच्या स्वप्नांना बळ देणारा : जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प देशाच्या “आर्थिक महासत्ता” होण्याच्या स्वप्नांना बळ देणारा असून समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून सादर करण्यात आलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांनी कुशल पद्धतीने समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात केलेला आहे. लेक लाडकी योजने सोबतच अंगणवाडी सेविकांची २० हजार पदे भरली जाणार असून याचा लाभ राज्यातील महिलांना होणार आहे. “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानात ४ कोटी महिला व मुलांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचाराची व्यवस्था अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. “शक्तीसदन” योजने अंतर्गत  नोकरदार महिलांसाठी ५० वसतीगृहांची निर्मिती करण्यात येणार असून याचा लाभ नोकरदार महिलांना होणार आहे. “किसान सन्मान निधी राज्य आणि केंद्र” मिळून १२ हजार झाल्यामुळे शेतकरी वर्गाला देखील दिलासा राज्य सरकार ने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिला आहे.ॉ

प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आणि शिक्षण व आरोग्य सेवेच्या स्तरावर जनहिताचा अर्थसंकल्प  – आमदार विनोद अग्रवाल-

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या हितावर आणि महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आणि शिक्षण आणि आरोग्य सेवेच्या पातळीच्या जनहितावर आधारित आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. यासोबतच रोजगाराच्या दृष्टीनेही अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकांच्या वेतनात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या योजनांचा लाभ जाहीर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मधील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. किसान सन्मान निधी अंतर्गत, सध्या केंद्र सरकारकडून वार्षिक 6000 रुपये मिळतात. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण १२ हजार रुपये मिळतील.

राज्याचा अर्थसंकल्प आपले सरकार भूमिकेला अभिप्रेत : माजी मंत्री राजकुमार बडोलेराज्यातील भाजप शिवसेनेचे सरकार आपले सरकार भूमिकेला अभिप्रेत असून केंद्र सरकारच्या पाऊला वर पाऊल टाकत शेतकरी वर्गासाठी किसान सन्मान निधी राज्य सरकार तर्फे सुरू करण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. सोबतच 1 रुपयात पिकांचा विमा उतरवता येणार असल्याने शेतकऱ्यांची खासगी विमा कंपनी कडून होणारी लुटमार थांबेल. मुलीचा जन्म झाल्यास 5 हजार आणि मुलगी 18 वर्षाची होताच 75 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे सोबतच महिलांना एस टी प्रवासात 50 टक्के सूट, आशा सेविकांचे मानधन 3500 हजार वरून 5000 रुपये करून महिलांचे सबलीकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राज्य सरकार ने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केला आहे. संजय गांधी श्रावण बाळ योजनेचे अर्थसहाय्य 1000 वरून 1500 केल्याने निराधार नागरिकांना याचा लाभ होणार आहे.

शेतक-यांना बळ देणारा हां अर्थसंकल्प – जिप सभापती रुपेश कुथे

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजार प्रोत्साहानपर अनुदान देणार आहे. तसेच शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा मिळेल. शेतकऱ्यांचा पीकविम्याचा हप्ता राज्य सरकार भरेल. तसेच मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक सिंचन योजनेची घोषणा देखील राज्य सरकारने केली आहे.- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले १२.८४ लाख पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात ४६८३ कोटी रुपये थेट जमा होणार आहे. आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर या योजनेवर १००० कोटी रुपये खर्च करणार