महावितरणचा सहाय्यक अभियंता वीस हजारांची लाच घेताना अडकला ट्रॅपमध्ये !

0
44

 अहमदनगर-महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा नगर जिल्ह्याल्या चिचोंडी पाटील सबस्टेशनचा सहायक अभियंता कमलेश युवराज पवार हा वीस हजार रुपयांची लाच घेण्याची तयारी असताना अँटी करप्शनच्या पथकाने लावलेल्या ट्रॅपमध्ये तो अडकलाय. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार यांचे अंभोरा तालुका आष्टी जिल्हा बीड, येथे आंबेश्वर कृषीवन पर्यटन हे रिसॉर्ट आहे. सदर ठिकाणी त्यांनी महावितरण अहमदनगर शाखा चिचोंडी पाटील, यांच्याकडून विद्युत कनेक्शन घेतलेले आहे. सदर कनेक्शनच्या मीटरमध्ये काही तरी छेडछाड केली म्हणून सदर मीटर तपासणीकरिता लाचखोर पवार याने ते काढून नेले होते.सदर मीटर पुन्हा जोडून देण्यासाठी आणि वरिष्ठ उपअभियंता कोपनर यांच्याकरिता ५० हजार रुपयांची मागणी लाचखोर पवार याने तक्रारदार यांच्याकडे केली.सदर तक्रारीवरून लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे तडजोड अंती २० हजार रुपये मागणी करून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून नगर तालुका पोलीस ठाणे येथे ३० मार्च रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी लोकसेवक याला ताब्यात घेण्यात आले आहे.शर्मिष्ठा वालावलकर, (पोलीस अधीक्षक), नारायण न्याहळदे, (अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक), नरेंद्र पवार (वाचक पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नाशिक), पोलीस उपअधीक्षक, पर्यवेक्षण अधिकारी हरिष खेडकर (ला प्र वि अहमदनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शरद गोरडे, पोलीस अंमलदार, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, राधा खेमनार, चालक पोलिस हवालदार दशरथ लाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.