वडेगाव येथे चावळी बांधकामाचे भुमिपूजन

0
5

■ स्थानिक आमदार निधीतून बांधकामास मंजूरी.

देवरी,दि.११: देवरी तालुक्यातील मौजा वडेगाव येथे शनीवार (दि.९ सप्टेंबर) रोजी येथील वार्ड क्रं.-१ च्या हनुमान मंदिर जवळ स्थानिक आमदार निधीतून मंजूर चावळीच्या बांधकामाचे भुमिपूजन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी वडेगाव ग्रामपंचायत चे सरपंच अंजुताई बिसेन, तंटा मुक्त संमतीचे अध्यक्ष मनोहर राऊत, माजी सरपंच छत्रपाल राऊत, ग्रा. पं. सदस्य सुषमाताई करचाल,अशोक वाढई, विजय भोयर, पालिका राऊत सदस्या, कांग्रेस कार्यकर्ता मुकुंद बागडे दुलिचंद राऊत, हिरामन राऊत, शामराव राऊत, मयाराम भोयर, सदाशिव करचाल, धनराज राऊत,भरत चाकाटे,
होमराजभोयर , आदिवासी संघटनेचे युवा अध्यक्ष सुमित येल्ले, पत्रकार विलास चाकाटे, ताराचंद राऊत,भोजराज राऊत,शिवलाल भोयर,किसन राऊत, .गणेश चाकाटे यांच्यासह वडेगाव परिसरातील युवक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.