चंद्रपूर,दि.14- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामाकामासाठी साहित्य पुरविणाऱ्या ठेकेदाराकडून ४१ हजारांची लाच घेणाऱ्या दोन सरपंचासह एका उपसरपंचास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. चिमूर तालुक्यातील बोरगाव (बुट्टी) चे सरपंच रामदास चौधरी (३९), उपसरपंच हरीश गायकवाड (४५) व आंबेनेरीचे सरपंच संदीप दोडके असे लाच घेणाऱ्या सरपंच व उपसरपंचाची नावे आहेत.चिमूर तालुक्यातील आंबेरी ग्राम पंचायत अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अन्य बांधकामाकरीता उमरेड येथील तक्रारदार ठेकेदाराला साहित्य पुरविण्याचे काम मिळाले होते. तक्रारदाराने शाळेच्या बांधकामाला लागणारे सर्व साहित्य पुरविले. पुरविलेल्या साहित्याचे धनादेश मागणी केली असता, आंबेनेरीचे सरपंच संदीप दोडके यांनी ५ टक्के कमिशननुसार ७८,६०० रूपये लाचेची मागणी केली होती.तडजोडीअंती ४१ हजार रूपये देण्याचे ठरले. मंगळवारी संदीप दोडके यांना ४१ हजार रूपये घेताना सरपंच संदीप दोडके यांना लाचलुचपत विभागाला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या सोबत असलेले बोरगाव बुटीचे सरपंच रामदास चौधरी, उपसरपंच हरीश गायकवाड यांचाही त्यामध्ये सहभाग असल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. चिमूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
४१ हजारांची लाच घेतांना दोन सरपंचासह एका उपसरपंच जाळ्यात
वाढदिवसाच्या शुभेच्छा