आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अंतरिम जामीन मंजूर

0
6

सोलापूर प्रतिनिधी : दि.२३ : मोहोळ येथे पोलीस स्टेशन अंतर्गत भा.द.वी ३०६, ३४ व ४५ महाराष्ट्र मनी लेंडिंग ऍक्ट प्रमाणे आरोपी रामचंद्र धोंडीबा चंदनशिवे व त्यांची पत्नी यांच्याविरुद्ध दिनांक २०,०९,२०२३ रोजी गुन्हा र.नं. ६९०/२०२४ गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्यामध्ये पेट्रोल पंप च्या मॅनेजर यास पैशाच्या कारणावरून पैसे परत देण्याचा तगादा लावून व दमदाटी करून त्याच्याकडून जबरदस्तीने शेतजमीन खरेदी केल्याच्या आरोपावरून मयत फिर्यादीचे पती नितीन आतकरे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची फिर्याद दाखल करण्यात आलेली होती. या कामी रामचंद्र व रोहिणी चंदनशिवे यांनी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज २१,०९२०२३ रोजी दाखल केला होता व त्यामध्ये आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे.जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. वरील प्रकरणांमध्ये आरोपीं तर्फे ॲड कदीर औटी ,ॲड.यासीन अजीज शेख व ॲड कापुरे यांनी हे काम पाहिले.